विवाहित-अविवाहित, तरूण-म्हातारे सगळ्यांनीच चान्स मारू बघितला ! कंगना राणौत पुन्हा बोलली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 13:35 IST2017-09-01T08:05:20+5:302017-09-01T13:35:20+5:30
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत चित्रपटांपेक्षा तिच्या सडेतोड वक्तव्यामुळेच अधिक चर्चेत असते. दमदार अभिनयाच्या जोरावर कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे ...

विवाहित-अविवाहित, तरूण-म्हातारे सगळ्यांनीच चान्स मारू बघितला ! कंगना राणौत पुन्हा बोलली!!
ब लिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत चित्रपटांपेक्षा तिच्या सडेतोड वक्तव्यामुळेच अधिक चर्चेत असते. दमदार अभिनयाच्या जोरावर कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण कंगनाची लव्ह लाईफ नेहमीच वादग्रस्त राहिली. मग ती आदित्य पांचोलीसोबत असो, शेखर सुमनचा मुलगा अध्ययनसोबत असो वा हृतिक रोशनसोबत. कंगनाला या रिलेशनशिपमुळे बरेच काही सहन करावे लागले. कदाचित या रिलेशनशिपने कंगनाला आनंद देण्याऐवजी कटू आठवणीच अधिक दिल्यात.
काल-परवा कंगनाने हृतिक रोशनसोबतचा वाद पुन्हा एकदा उखरून काढला. हृतिकसोबतचा वाद कधीच शांत होणार नाही. अजून हृतिकला हात जोडून माफीही मागायची आहे, असे कंगना अलीकडे एका टीव्ही शोमध्ये म्हणाली होती. यानंतर कंगनाने फिल्मफेअर मॅगझिनला मुलाखती दिलीयं. या ताज्या मुलाखतीतही कंगना अगदी बेधडक बोलली. मुलांकडून मिळणाºया अटेंशनवर ती बोलली.
करिअरच्या सुरुवातीपासून अनेक पुरूष माझ्यावर चान्स मारू बघितला. मग ते विवाहित असो वा अविवाहित, म्हातारे असो वा तरूण. या सगळ्यांनाच माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यात इंटरेस्ट होता. मी स्टुडंट होते तेव्हाही आणि मी मॉडेलिंगमध्ये स्ट्रगल करत होते, तेव्हाही पुरूषांचे वागणे सारखेच होते, असे ती म्हणाली.
ALSO READ : कंगना राणौतने हृतिक रोशनला पुन्हा डिवचले; म्हटले हात जोडून मागायला लावेल माफी !
फिल्म इंडस्ट्रीत को-स्टार्ससोबतच्या रिलेशनशिपबद्दल कंगनाला विचारण्यात आला. यावरही कंगनाने तेवढेच बिनधास्त उत्तर दिले. जेव्हा तुम्ही एखाद्या पुरूषाला नकार देता, तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दल राग निर्माण होतो. त्या खराब वातावरणात काम करणे बरेच कठीण होऊन बसते आणि जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत फिजिकल होता, तेव्हा तर अडचणी आणखीच वाढतात. पुरूष आणि स्त्री यांच्यातील हे नाते प्रत्येक ठिकाणी एकसारखेच असते, असे ती म्हणाली. मी संघर्षाच्या काळात शारिरीक शोषणाला बळी पडले. त्या माणसाने स्वत:ला माझ्यावर लादण्याचे प्रयत्न केलेत. मी त्याच्यासोबत कुठल्याच चित्रपटात काम करत नसूनही त्याने हे केले. त्यामुळे या गोष्टीला मी फिल्म इंडस्ट्रीशी जोडून बघत नाही, असे कंगना म्हणाली.