बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:46 IST2025-11-05T11:45:02+5:302025-11-05T11:46:40+5:30
लपून छपून सुरू होतं बॉलिवूड अभिनेत्याचं एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर, पत्नीने मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...

बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचं लाइफ आणि अफेअर हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. अनेक सेलिब्रिटींचे संसार लग्नानंतर एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर केल्यामुळे मोडले आहेत. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याचेही लग्नानंतर एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर सुरू होतं. त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंधही होते. अभिनेत्याच्या पत्नीला हे समजताच तिने डिटेक्टिव्हची मदत घेतली. त्या डिटेक्टिव्हने याचा खुलासा केला आहे.
प्राइव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरी हिने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत काही बॉलिवूड सेलिब्रिटींची गुपितं उघड केली आहेत. तान्याने विवाहित असलेल्या आणि दोन मुलांचा बाप असलेल्या एका बॉलिवूड अभिनेत्याच्या अफेअर्सबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. या अभिनेत्याचं नाव मात्र तिने गुपित ठेवलं आहे. तान्या म्हणाली, "बॉलिवूडमध्ये एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर्सच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण, याबाबत कोणीच उघडपणे बोलत नाही. कारण, सेलिब्रिटींना त्यांची आदर्श अशी इमेज ठेवायची असते. मी एका अशा कपलबद्दल सांगणार आहे ज्यांचं लग्न २०००च्या सुरुवातीला झालं होतं. तिचा नवरा जो बॉलिवूड अभिनेता आहे. त्याचे अनेक तरुण अभिनेत्रींसोबत संबंध आहेत".
"त्याच्या पत्नीलाही याबाबत माहीत आहे आणि त्याच्या दोन मुलांनाही. त्याची दोन्ही मुलं इंडस्ट्रीत काम करत आहेत. मुलांना चांगलंच माहीत आहे की त्यांचे वडील काय करतात. पण, कॅमेऱ्यासमोर ते एक परफेक्ट कपल म्हणूनच दाखवतात. नवऱ्यावर संशय आल्याने अभिनेत्याच्या पत्नीने आमची मदत घेतली. तिच्या मॅनेजरने आम्हाला संपर्क केला होता. तपास केल्यानंतर समजलं की त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध होते. त्यानंतर पत्नीने तिच्या पतीला याबद्दल विचारल्यानंतर अभिनेत्याने कबुली दिली. तो अशा जागी जायचा जिथे त्याचं शूटिंगच नसायचं. त्याने सांगितलेल्या स्टोरीवर पत्नीचा विश्वास बसत नव्हता. म्हणून मग तिने आमच्याकडे हे काम दिलं", असं डिटेक्टिव्ह तान्याने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, "लग्नानंतर २० वर्षांनी त्या अभिनेत्याने असं करण्याचा निर्णय घेतला. त्या कपलसाठी फिजिकल इंटीमसी म्हणजे धोका नव्हती. अभिनेत्याची पत्नी त्याला माफ करत राहिली. पण, जेव्हा मुलांना याबाबत कळलं तेव्हा मग तिने नवऱ्याकडे याचा जाब विचारला. तिच्यासाठी कदाचित इमोशनल चिटींग ही फिजिकल चिटींगपेक्षा जास्त मोठी होती".