लग्नाची ‘सिल्व्हर ज्युबली’ उदयपूरमध्ये साजरी करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 10:05 IST2016-02-28T17:05:28+5:302016-02-28T10:05:28+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लग्नाला उणेपुरे सात आठ वर्षे झाली असताना लग्नाची सिल्व्हर ज्युबली साजरी करण्याचे प्लॅनिंग तिने सुरु केले ...

लग्नाची ‘सिल्व्हर ज्युबली’ उदयपूरमध्ये साजरी करणार
अ िनेत्री शिल्पा शेट्टीच्या लग्नाला उणेपुरे सात आठ वर्षे झाली असताना लग्नाची सिल्व्हर ज्युबली साजरी करण्याचे प्लॅनिंग तिने सुरु केले आहे. ‘झीलों की नगरी’ उदयपूर येथे तिला तिच्या लग्नाची सिल्व्हर ज्युबली साजरी करायचीय. सन २००९मध्ये शिल्पा राज कुंद्रा या उद्योगपतीसोबत लग्नगाठीत अडकली होती. रविवारी एका ज्वेलर्स शोरूमच्या उद्घाटनासाठी शिल्पा उदयपूरला आली होती. यावेळी उदयपूर माझे सर्वात आवडते शहर असल्याचे तिने सांगितले. येथील प्रशस्त राजवाडे, त्यांचे सौंदर्य मला खिळवून ठेवते. या शहरात माझे लग्न झाले नाही. पण माझ्या लग्नाची सिल्व्हर ज्युबली मात्र मी इथेच साजरी करेल, असे ती म्हणाली.