‘विवाह’!! अमृता राव व अनमोल यांचे शुभमंगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 17:06 IST2016-05-15T11:36:55+5:302016-05-15T17:06:55+5:30
‘विवाह’ चित्रपटातून खºया अर्थाने नावारूपास आलेली अभिनेत्री अमृता राव ही आज (१५मे) विवाहबंधनात अडकली. रेडिओ जॅकी अनमोलसोबत तिने सात ...

‘विवाह’!! अमृता राव व अनमोल यांचे शुभमंगल
‘ िवाह’ चित्रपटातून खºया अर्थाने नावारूपास आलेली अभिनेत्री अमृता राव ही आज (१५मे) विवाहबंधनात अडकली. रेडिओ जॅकी अनमोलसोबत तिने सात फेरे घेतले. गेल्या सात वर्षांपासून अमृता व अनमोल रिलेशनशिपमध्ये होते. अनमोलने विवाहाची गोड बातमी टिष्ट्वटर व फेसबुक पेजवर शेअर केली. जस्ट मॅरिड..असे लिहित आम्हाला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे...असे अनमोलने लिहिले आहे. सध्या अमृता छोट्या पडद्यावरील ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेत दिसत आहे. ‘इश्कविश्क’, ‘जॉली एलएलबी’,‘दीवार’,‘मैं हूं ना’, ‘दी लिजेंड आॅफ भगत सिंह’ अशा अनेक चित्रपटात अमृता झळकली.
![]()