Mardaani 3 Box Office: राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' सिनेमाने पहिल्या दिवशी केली थक्क करणारी कमाई, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 09:43 IST2026-01-31T09:42:50+5:302026-01-31T09:43:50+5:30

बॉलिवूडची 'मर्दानी' अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा 'शिवानी शिवाजी रॉय' या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतली आहे. तिच्या बहुप्रतिक्षित 'मर्दानी ३' या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली असून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे.

Mardaani 3 movie Box Office collection first day yash raj films rani mukherjee | Mardaani 3 Box Office: राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' सिनेमाने पहिल्या दिवशी केली थक्क करणारी कमाई, जाणून घ्या

Mardaani 3 Box Office: राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' सिनेमाने पहिल्या दिवशी केली थक्क करणारी कमाई, जाणून घ्या

बॉलिवूडची 'मर्दानी' अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा 'शिवानी शिवाजी रॉय' या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतली आहे. तिच्या बहुप्रतिक्षित 'मर्दानी ३' या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली असून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे.

'मर्दानी ३' ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जरी हा आकडा खूप मोठा वाटत नसला तरी, राणी मुखर्जीच्या मागील 'मर्दानी २' चित्रपटाच्या तुलनेत ही चांगली कामगिरी आहे. 'मर्दानी २' ने पहिल्या दिवशी ३.८० कोटींची कमाई केली होती, त्या तुलनेत तिसऱ्या भागाला प्रेक्षकांनी अधिक पसंती दर्शवली आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा एका गंभीर सामाजिक विषयावर भाष्य करताना दिसत आहे. चित्रपटातील तिची अ‍ॅक्शन आणि दमदार संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे ठरत आहेत. सोशल मीडियावरही चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळत असून येणाऱ्या शनिवार आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'मर्दानी' फ्रँचायझीची आतापर्यंतची कामगिरी पाहता, हे चित्रपट नेहमीच आशयघन विषयांसाठी ओळखले जातात. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात राणीने दाखवलेले पोलिसाचे धाडसी रूप पुन्हा एकदा महिला प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती काळ तग धरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title : Mardaani 3 की दमदार शुरुआत: पहले दिन रानी मुखर्जी की फिल्म ने किया प्रभावित

Web Summary : रानी मुखर्जी की 'मर्दानी 3' ने बॉक्स ऑफिस पर अच्छी शुरुआत की, पहले दिन ₹5-6 करोड़ कमाए। यह 'मर्दानी 2' से बेहतर प्रदर्शन है, जिसे सकारात्मक समीक्षाओं और रानी के दमदार अभिनय से बढ़ावा मिला। फिल्म एक गंभीर सामाजिक मुद्दे पर बात करती है, जो दर्शकों को बांधे रखती है।

Web Title : Mardaani 3 Opens Strong: Rani Mukerji's Film Impresses on Day One

Web Summary : Rani Mukerji's 'Mardaani 3' sees a promising box office start, earning ₹5-6 crore on its opening day. This exceeds 'Mardaani 2's' initial performance, fueled by positive reviews and Rani's powerful portrayal of Shivani Shivaji Roy. The film tackles a serious social issue, captivating audiences with action and impactful dialogue.