अभिनयातच नव्हे नृत्यातही अव्वल आहे मांजरेकरांची लेक; सईचा कथ्थक करतानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 19:14 IST2022-07-25T19:13:22+5:302022-07-25T19:14:09+5:30
Saiee manjrekar: उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सई केवळ अभिनयातच नव्हे नृत्य कौशल्यातही निपूण असल्याचं पाहायला मिळतं.

अभिनयातच नव्हे नृत्यातही अव्वल आहे मांजरेकरांची लेक; सईचा कथ्थक करतानाचा व्हिडीओ व्हायरल
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांच्या लेकींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एक लेक मराठी कलाविश्वात तिचं स्थान निर्माण करत आहे. तर, दुसरी बॉलिवूडमध्ये. यामध्येच 'दबंग 3' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सईचा (saiee manjrekar) चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सई केवळ अभिनयातच नव्हे नृत्य कौशल्यातही निपूण असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मानव मंगलानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सईचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सई कथ्थकचा सराव करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तिची नजाकत पाहून पुन्हा एकदा चाहते तिच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे. सईने अभिनेता सलमान खानच्या 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.