लॉकडाऊनमुळे या अभिनेत्याचे कुटुंब अडकलंय दुबईत, तर टिव्ही पाहत एकटा वेळ घालवतोय हा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 13:00 IST2020-04-09T12:58:00+5:302020-04-09T13:00:03+5:30
बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आणि टिव्ही पाहात आपला वेळ घालवत आहे.

लॉकडाऊनमुळे या अभिनेत्याचे कुटुंब अडकलंय दुबईत, तर टिव्ही पाहत एकटा वेळ घालवतोय हा अभिनेता
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त तिच्या दोन्ही मुलांसोबत सध्या दुबईमध्ये अडकली आहे तर संजय मुंबईत आहे.
संजय दत्तची पत्नी आणि दोन्ही मुलं दुबईत असल्याने तो सध्या त्यांना प्रचंड मिस करत आहे. तो घराच एकटाच असून कुटुंबियांशिवाय राहाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाहीये. मान्यता दोन्ही मुलांना घेऊन दुबईला फिरायला गेली होती. पण लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे ती दुबईतच मुलांसोबत राहात आहे तर संजय सोशल मीडियाद्वारे आपल्या फॅन्सशी संवाद साधत आपला वेळ घालवत आहे. एवढेच नव्हे तर संजय टिव्हीवर सध्या रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांचा देखील आनंद घेत आहे.
संजय दत्तने नुकताच त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे तो त्याच्या फॅन्सना सांगत आहे की, तुम्ही घरात बसून व्यायाम करा... शरीर तंदुरुस्त बनवा... पण घराच्या बाहेर कुठेच जाऊ नका...लोकांनी घरातच राहावे आणि सुरक्षित राहावे असे संजय त्याच्या फॅन्सना या व्हिडिओद्वारे आवाहन करताना दिसत आहे.