मर्डर, रोमान्स आणि डबल रोल...मनोज वाजपेयी यांच्या 'किलर सूप' सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:31 IST2024-01-03T15:26:41+5:302024-01-03T15:31:41+5:30

'किलर सूप'चा 2 मिनिटे 22 सेंकदाचा हा ट्रेलर सस्पेन्सने परिपुर्ण आहे.

Manoj Bajpayee's and Konkona Sen Sharma's 'Killer Soup' trailer is out | मर्डर, रोमान्स आणि डबल रोल...मनोज वाजपेयी यांच्या 'किलर सूप' सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

मर्डर, रोमान्स आणि डबल रोल....मनोज वाजपेयी यांच्या 'किलर सूप' ही वेबसीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

एक हरहुन्नरी प्रतिभावंत कलाकार म्हणून मनोज वाजपेयी यांना ओळखला जातो.  वैविध्यपूर्ण भूमिका साकारत  मनोज वाजपेयी यांनी प्रेक्षकांवर एक वेगळी छाप सोडली आहे. चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. 'द फॅमिली मॅन'नंतर आता ते लवकरच ओटीटीवर 'किलर सूप' या मिस्ट्री थ्रिलर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातच 'किलर सूप'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'किलर सूप'चा 2 मिनिटे 22 सेंकदाचा हा ट्रेलर सस्पेन्सने परिपुर्ण आहे.  तसेच 'बॉम्बे' चित्रपटातील 'तू ही रे' हे गाणे बॅकग्राऊंडमध्ये ऐकायला येते. 'किलर सूप' या वेब सीरिजमध्ये कोंकणा सेन शर्मा पहिल्यांदाच मनोज बाजपेयीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर किलर सूपचे दिग्दर्शन अभिषेक चौबे करत आहेत. या मालिकेत मनोज बाजपेयी पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

मृत्यूचे गूढ उलगढणारी ही सीरिज हिंदी व्यतिरिक्त तामिळ-तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये नेटफ्लिक्सवर 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.  ट्रेलर पाहून चाहत्यांनी मनोज यांच्या दमदार अभिनयाचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहले, 'मनोज सर हे अभिनयातील अष्टपैलूपणाचे परिपूर्ण उदाहरण आहे'. तर एकाने कमेंट केली की, हा सर्वोत्तम क्राईम थ्रिलर असणार आहे! ते पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही'.

मनोज बाजपेयी कायम स्वतःच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. मनोज बाजपेयी यांनी ‘द फॅमिली मॅन’, ‘सत्या’, ‘गुलमोहर’, ‘जोराम’, ‘शुटआऊट एट वडाला’, ‘स्पेशल 26’, ‘सिर्फ एक बंदा काफी है’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील मनोज बाजपेयी कायम सक्रिय असतात. आतापर्यंत अनेक दमदार भूमिकांना न्याय देत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर फक्त आणि फक्त मनोज बाजपेयी याचं राज्य आहे.

Web Title: Manoj Bajpayee's and Konkona Sen Sharma's 'Killer Soup' trailer is out