गावाकडं चल दोस्ता... बालपणीच्या मित्रांना भेटले मनोज वाजपेयी, स्वतः जीप चालवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:35 IST2025-04-03T15:34:49+5:302025-04-03T15:35:08+5:30

मनोज वाजपेयी यांनी त्याच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली.

Manoj Bajpayee visits His Village Bettiah Bihar Met His Childhood Friends Drive Old Jeep | गावाकडं चल दोस्ता... बालपणीच्या मित्रांना भेटले मनोज वाजपेयी, स्वतः जीप चालवली!

गावाकडं चल दोस्ता... बालपणीच्या मित्रांना भेटले मनोज वाजपेयी, स्वतः जीप चालवली!

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. मनोज वाजपेयी यांना इंडस्ट्रीत नाव कमाविण्यासाठी केवढी मेहनत केली, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याने सर्वकाही फक्त मेहनत, समर्पण आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर कमावलंय. अफाट यश मिळवलं असलं तरी मनोज वाजपेयी यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत.  त्यांचा साधेपणा हा कायम लक्ष वेधून घेत असतो. सध्या मनोज वाजपेयी यांनी त्याच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली आहे.

मनोज वाजपेयी हे नुकतंच त्यांच्या मूळ गावी पश्चिम चंपारण (Manoj Bajpayee visits His Village) येथे पोहोचले. मनोज वाजपेयी यांना गावात पाहिल्यानंतर आपला मुलगा किंवा भाऊ अनेक वर्षांनी घरी परतल्याचा आनंद गावकऱ्यात पाहायला मिळाला. यावेळी मनोज हे पूर्णपणे देसी रंगात रंगलेले दिसून आले. कोणताही दिखावा न करता गावातील साधेपणात मिसळले. बालपणीच्या मित्रांसोबत खास वेळही घालवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एवढंच काय तर  गावातील रस्त्यांवर त्यांनी जुनी जीपही चालवली.  बॉलिवूडचा स्टार इतक्या सहजपणे गावाच्या मातीत मिसळून गेल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. 

 सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मनोज वाजपेयी यांचीच चर्चा होतीये. त्यांचा हा साधेपणा पहिल्यांदा दिसला नसून अनेकदा पाहायला मिळाला आहे. मनोज यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचं अभिनय, त्यांची स्टाइल यांची भुरळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असल्याचं पहायला मिळतं. मनोज यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते लवकरच 'द फॅमिली मॅन' या लोकप्रिय सीरिजच्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  येत्या नोव्हेंबरमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. 

Web Title: Manoj Bajpayee visits His Village Bettiah Bihar Met His Childhood Friends Drive Old Jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.