मनोज वाजपेयी रुग्णालयात; मात्र सर्वकाही ‘आॅल इज वेल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 16:26 IST2017-07-15T10:56:17+5:302017-07-15T16:26:17+5:30

अभिनेता मनोज वाजेपयी सध्या ‘अय्यारी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र प्रचंड डोकेदुखीच्या त्रासामुळे त्याला शूटिंग सोडून रुग्णालयात दाखल ...

Manoj Bajpayee hospital; But everything is 'All Is Well'. | मनोज वाजपेयी रुग्णालयात; मात्र सर्वकाही ‘आॅल इज वेल’

मनोज वाजपेयी रुग्णालयात; मात्र सर्वकाही ‘आॅल इज वेल’

िनेता मनोज वाजेपयी सध्या ‘अय्यारी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र प्रचंड डोकेदुखीच्या त्रासामुळे त्याला शूटिंग सोडून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. गेल्या बुधवारी अशी बातमी समोर आली होती की, मनोजला वारंवार  डोकेदुखीचा त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी माध्यमांमध्ये झळकताच चाहत्यांकडून त्याच्या तब्येतीविषयी सातत्याने विचारणा होत होती. आता आलेल्या माहितीनुसार, मनोजची तब्येत ठिकठिक असून, सर्वकाही ‘आॅल इज वेल’ असल्याचे सांगितले जात आहे. 

मनोजने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘मी आगामी ‘अय्यारी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला आहे. मला प्रचंड डोकेदुखी जाणवत होती. प्राथमिक उपचार करूनही त्यामध्ये कुठल्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती. त्यामुळे ही डोकेदुखी सामान्य नसून, हा एखाद्या आजाराचा प्रकार असावा, अशी शंका उपस्थित केली गेली. त्यामुळे रुग्णालयात दाखल होऊन सर्व आवश्यक चाचण्या करून घेतल्या. मात्र आता सर्व काही ठिकठाक असून, मी कामावर परतलो आहे. धन्यवाद!’ असे मनोजने स्पष्ट केले आहे. 

मनोजला डोकेदुखीचा त्रास होत असल्याने चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांना असे वाटले की, आता चित्रपटाची शूटिंग बंद करावी लागणार आहे. मात्र आता मनोज लंडनला परतला असून, त्याची तब्येत एकदम ठिकठिक आहे. या चित्रपटात मनोजबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा आणि नसिरुद्दीन शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिद्धार्थ चित्रपटात सैन्य अधिकाºयाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटाची कथा दोन सैन्य अधिकाºयांच्या अवती-भोवती फिरते. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. 

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने एक फोटो शेअर करताना चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे म्हटले होते. फोटोमध्ये सिद्धार्थ आणि मनोज सैनिकांच्या पोशाखात दिसत होते. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर आजही व्हायरल होत आहे. शीतल भाटिया निर्मित हा चित्रपट २६ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Manoj Bajpayee hospital; But everything is 'All Is Well'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.