मनोज वाजपेयी अन् के. के. मेनन एकत्र येणार ? अभिनेत्यानं दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:43 IST2025-01-10T16:43:26+5:302025-01-10T16:43:39+5:30

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee ) आणि के. के. मेनन. (Kay Kay Menon) या दोन्ही अभिनेत्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

Manoj Bajpayee denies Reports Of Teaming Up With Kay Kay Menon For Neeraj Pandey’s Next | मनोज वाजपेयी अन् के. के. मेनन एकत्र येणार ? अभिनेत्यानं दिली प्रतिक्रिया

मनोज वाजपेयी अन् के. के. मेनन एकत्र येणार ? अभिनेत्यानं दिली प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत, ज्यांच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. अशी वेगळीच क्रेझ असलेले दोन अभिनेते आहेत मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee ) आणि के. के. मेनन. (Kay Kay Menon) या दोन्ही अभिनेत्यांना एका प्रोजेक्टमध्ये पाहण्याची चाहत्याची इच्छा आहे. नुकतंच मनोज आणि के. के. मेनन हे दोघेही दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर थेट आता मनोज वाजपेयीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या पुढील प्रकल्पासाठी मनोज बाजपेयी के. के. मेननसोबत काम करणार असल्याच्या काही पोस्ट X वर व्हायरल झाल्या आहेत. या पोस्ट रिट्विट करत मनोजने हे दावे फेटाळून लावले आहेत.  "हे कधी घडले?" असं त्याने म्हटलं. तसेच दुसऱ्या एका पोस्टवर "अशा बातम्या कुठून सुरू होतात?" असं म्हटलं. 

दरम्यान, मनोज वाजपेयी आणि के. के. मेनन. या दोन कलाकारांनी डिजिटल विश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे. आजवर दोघांच्याही बऱ्याच वेब सिरीज आणि डीजिटलवरील चित्रपट लोकप्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मनोजचा 'डिस्पॅच' चित्रपट आणि केकेची 'मुर्शीद' ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रेक्षक एकीकडे 'फॅमिली मॅन ३'मधील श्रीकांत तिवारीची, तर दुसरीकडे 'स्पेशल ऑप्स'मधील हिम्मत सिंगची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

Web Title: Manoj Bajpayee denies Reports Of Teaming Up With Kay Kay Menon For Neeraj Pandey’s Next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.