'मनमा.' शूटिंगवेळी कृती जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:58 IST2016-01-16T01:09:28+5:302016-02-05T10:58:26+5:30
शाहरूख खान, काजोल, वरूण धवन आणि कृती सेनन या टीमचा आगामी चित्रपट 'दिलवाले' ची सर्व फॅन्स खुप आतुरतेने वाट ...

'मनमा.' शूटिंगवेळी कृती जखमी
श हरूख खान, काजोल, वरूण धवन आणि कृती सेनन या टीमचा आगामी चित्रपट 'दिलवाले' ची सर्व फॅन्स खुप आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील गाणे खुपच हिट होत असून 'मनमा इमोशन जागे' गाण्याच्या शूटिंगवेळीची एक घटना सर्वांसमोर आली आहे. वरूण धवनला १२ फुट उंच एका ट्रकवर उडी घ्यायची असते. आणि कृती सेनन देखील वरूणच्या हाताला धरून एवढी उंच उडी घेण्याच्या तयारीत असते. पण प्लॅनिंगनुसार काहीच झाले नाही. तिच्या उंच पायांमुळे इथे तिला दुखापतच झाली. त्या दोघांनी ट्रकमधून उड्या घेतल्या. पण वरूणची उंची कृतीच्या तुलनेत कमी असल्याने वरूणने सेफ लँडिंग केली आणि कृतीला मात्र अडखळतच उतरावे लागले. पण, असं वाटतं कृती हे सर्व तर होणारच. अनुभवी कलाकार होणं इतकं काही सोपं नक्कीच नाही ना.

