या बी ग्रेड सिनेमात काम केल्यामुळे मनीषा कोईरालावर उठली होती टीकेची झोड, दिलेले खूप बोल्ड सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:33 IST2025-02-07T18:33:20+5:302025-02-07T18:33:44+5:30
Manisha Koirala : अभिनेत्री मनीषा कोईराला नेहमीच तिच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी ओळखली जाते, परंतु तिने तिच्या कारकिर्दीत एक चित्रपट केला ज्यासाठी तिच्यावर खूप टीका झाली होती.

या बी ग्रेड सिनेमात काम केल्यामुळे मनीषा कोईरालावर उठली होती टीकेची झोड, दिलेले खूप बोल्ड सीन
बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला नेहमीच तिच्या उत्कृष्ट आणि मोहक भूमिकांसाठी ओळखली जाते, परंतु तिने तिच्या कारकिर्दीत एक चित्रपट केला ज्यासाठी तिच्यावर खूप टीका झाली होती. २००२ साली रिलीज झालेला लव्हस्टोरी हा तिचा एक चित्रपट होता. २ तास २ मिनिटांच्या या चित्रपटात मनीषाने बोल्ड आउटफिट्स आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. मनीषा सारख्या अभिनेत्रीने अशी भूमिका करावी अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. शशिलाल के. नायर दिग्दर्शित, या चित्रपटात मनीषा कोईराला यांच्यासह आदित्य सील, सरोज भार्गव आणि रणवीर शौरी मुख्य भूमिकेत होते.
लव्हस्टोरी सिनेमाची कथा एका किशोरवयीन मुलाभोवती फिरते जो त्याच्या समोर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका महिलेकडे आकर्षित होतो. तो गुपचूप दुर्बिणीतून तिच्याकडे पाहतो आणि तिच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. त्याचा मोह इतका वाढतो की त्याला सतत तिच्याभोवतीच राहावेसे वाटते. एके दिवशी तो तिला दुसऱ्या पुरुषासोबत इंटिमेट होताना पाहतो, ज्यामुळे त्याचे मन तुटते. तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि तो तिचा पाठलाग करतो. पुढे जे घडते ते अनपेक्षित वळण घेते.
बोल्ड सीनमुळे वादात अडकली होती अभिनेत्री
लव्हस्टोरी सिनेमातील मनीषाच्या बोल्ड सीनमुळे त्यावेळी बराच वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील काही सीन्स इतके बोल्ड मानले गेले होते की ते कुटुंबासह पाहण्यासारखे नव्हते. दीड कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या छोट्याशा प्रेमकथेला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. सध्या त्याचे IMDb रेटिंग ३.१ आहे.