​ मनीषा कोईराला ख-या आयुष्यातही बनणार आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 13:18 IST2017-02-20T07:48:21+5:302017-02-20T13:18:21+5:30

अभिनेत्री मनिषा कोईराला लवकरच संजय दत्तच्या बायोपिकमध्ये नर्गिसची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला ही बातमी दिली. ...

Manisha Koirala is going to be made in her life! | ​ मनीषा कोईराला ख-या आयुष्यातही बनणार आई!

​ मनीषा कोईराला ख-या आयुष्यातही बनणार आई!

िनेत्री मनिषा कोईराला लवकरच संजय दत्तच्या बायोपिकमध्ये नर्गिसची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला ही बातमी दिली. शिवाय या भूमिकेसाठी मनीषा किती उत्सूक आहे, हेही सांगितले. पण याशिवाय आणखी एका गोष्टीसाठी मनीषा कमालीची उत्सूक आहे. होय, पडद्यावर आई बनण्याच्या तयारीत असलेली मनीषा ख-या आयुष्यातही आई बनणार आहे. मनीषाला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. सगळे काही नियोजनानुसार पार पडलेच तर येत्या वर्षभरात मनीषा एका गोंडस मुलीची आई झालेली दिसेल.
काही वर्षांपूर्वी मनीषाला कॅन्सरने घेरले होते. हा मनीषासाठीच नाही तर तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. पण या धक्क्यातून मनीषा आता पुरती सावरली आहे. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मनीषाने कॅन्सरविरोधातील लढाई जिंकली. आता मनीषा पूर्णपणे कॅन्सरमुक्त झालीय. त्यामुळे आता आयुष्यात आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे मनीषाने ठरवले आहे. हे पाऊल म्हणजेच, एक मुलगी दत्तक घेणे. मनीषा याबद्दल सांगते,‘ सगळे काही ठरवल्यानुसार पार पडले तर मला एका मुलीला दत्तक घ्यायचे आहे. सगळे काही नीट पार पडेल, अशी मी आशा करते. माझ्या आयुष्यात एक चिमुकला जीव यावा आणि त्याने माझे अख्खे आयुष्य व्यापून टाकावे, असे मला वाटतेय. आयुष्याच्या या नव्या इनिंगसाठी मी प्रचंड उत्सूक आहे. आता आणखी प्रतीक्षा करणे माझ्यासाठी कठीण झाले आहे.’
गेल्या दोन वर्षांपासून मनीषाने या स्वप्नाचा ध्यास घेतला आहे. तिचे हे स्वप्न लवकर पूर्ण व्हावे, याच आमच्या शुभेच्छा.

ALSO READ : ​मनीषा कोईराला बनणार संजय दत्तची ‘आई’!
नव्वदच्या दशकातील ‘या’अभिनेत्रींचा ‘पार्टी मूड’ तुम्ही पाहिलात का?

मनीषाने सन २०१०मध्ये मनीषाने सम्राट दहल या नेपाळी व्यापाºयाशी लग्न केले होते. पण हे लग्न उणापुरे दोन वर्षे टिकले. २०१२ मध्ये मनीषाने घटस्फोट घेतला.

Web Title: Manisha Koirala is going to be made in her life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.