मणिपूरमधील महिला अत्याचाराबाबत सोनू सूदचं संतप्त ट्वीट, म्हणाला, “माणुसकीची धिंड...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:08 PM2023-07-20T16:08:04+5:302023-07-20T16:08:34+5:30

Manipur Violence : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या व्हिडिओवर सोनू सूदची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला...

manipur women violence video bollywood actor sonu sood angry reaction | मणिपूरमधील महिला अत्याचाराबाबत सोनू सूदचं संतप्त ट्वीट, म्हणाला, “माणुसकीची धिंड...”

मणिपूरमधील महिला अत्याचाराबाबत सोनू सूदचं संतप्त ट्वीट, म्हणाला, “माणुसकीची धिंड...”

googlenewsNext

मणिपूरमधील महिल्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दोन महिलांची विविस्त्र धिंड काढल्याच्या धक्कादायक प्रकाराने मणिपूर हादरुन गेले आहे. मणिपूरमधील या घटनेवर कलाविश्वातील सेलिब्रिटींनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही ट्वीट केलं आहे.

सोनू सूदने ट्वीट करत मणिपूरमधील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “मणिपूरमधील व्हिडिओ पाहून अनेकांचं मन हेलावलं असेल. त्या महिलेची नाही तर माणुसकीची धिंड काढली गेली होती,” असं म्हणत सोनू सूदने संताप व्यक्त केला आहे. सोनू सूदच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मणिपूरमधील महिला अत्याच्याराच्या व्हिडिओवर अक्षयची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, “गुन्हेगारांना...”

मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

मणिपूरमध्ये कुकी समुदायातील तीन महिलांची मैतेई समुदायातील लोकांकडून छेडछाड करण्यात आली होती. ४ मे रोजी त्यांना निर्वस्त्र करुन धिंड काढण्यात आली होती. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तीन महिलांना निर्वस्त्र करुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. यातील १९ वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. मणिपूरमधील या व्हायरल झालेल्या व्हिडिओची मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: manipur women violence video bollywood actor sonu sood angry reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.