'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' सिनेमातील कंगना रानौतचा रणरागिणी लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 16:29 IST2018-10-01T16:28:54+5:302018-10-01T16:29:58+5:30

कंगना रानौतच्या बहुचर्चित 'मणिकर्णिका -द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातील आणखीन एक लूक समोर आला आहे. यात कंगना रणरागिणी अवतारात दिसते आहे.

'Manikarnika-The Queen of Jhansi' Kangana Ranaut's Ranger's Look in the Cinema | 'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' सिनेमातील कंगना रानौतचा रणरागिणी लूक

'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' सिनेमातील कंगना रानौतचा रणरागिणी लूक

ठळक मुद्दे 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी'मधील कंगनाचा रणरागिणी लूककंगनाने गिरवले तलवारबाजीचे धडे


बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातील आणखीन एक नवीन लूक समोर आला आहे. या लूकमध्ये कंगनाने सफेद रंगाची वेशभूषा केली असून ती योद्धेच्या रुपात दिसत आहेत. हातात तलवार घेऊन ब्रिटींशांविरूद्ध लढण्यासाठी सज्ज असल्याचे त्यातून दिसत आहे. या फोटोत इंग्रज व झाशीच्या सैन्यामध्ये रंगलेले युद्धाची पार्श्वभूमी यात दिसते आहे. 
 

सूत्रांच्या माहितीनुसार 'मणिकर्णिका'साठी कंगनाने खूपच जबरदस्त असे अॅक्शन सीन्स दिले आहेत. तसेच या सिनेमातील राणी लक्ष्मीबाईच्या प्रमुख भूमिकेसाठी कठोर मेहनतसुद्धा घेतली. या सिनेमात घोडेस्वारीसोबतच अनेक स्टंट करताना दिसणार आहे. तिने यासाठी तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. 
येत्या 2 ऑक्टोबर रोजी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित होत आहे. सर्वांनाच याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

या सिनेमाबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे शरीक पटेल म्हणाले, 'झाशीच्या राणीचे शौर्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचावे हा या सिनेमामागचा महत्त्वाचा हेतू आहे. स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल व हा सिनेमा प्रत्येकाचं मन जिंकून घेईल अशी आम्हाला आशा आहे.'
'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगनाचा रणरागिणी अंदाज व अॅक्शन करताना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: 'Manikarnika-The Queen of Jhansi' Kangana Ranaut's Ranger's Look in the Cinema