या चिमुरड्याला ओळखलंत का ?, हा आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता व होस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 18:26 IST2020-05-07T18:25:12+5:302020-05-07T18:26:02+5:30
या अभिनेत्याने त्याच्या बालपणीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या चिमुरड्याला ओळखलंत का ?, हा आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता व होस्ट
आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने सर्वांना खळखळून हसविणारा व मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे मनीष पॉल. लॉकडाउनमुळे सध्या तो घरात कैद आहेत. यादरम्यान तो कुकिंंग सेशन व सिंगिंग करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
मनीष पॉलने नुकताच्या त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे ज्यात त्याने त्याच्या आईचा उल्लेख केला आहे. जेव्हा त्याचे केस मोठे होते. त्याने फोटो शेअर करून कॅप्शन दिले आहे की, एक तर माझ्या आईला माझे पोनी टेल बांधायला खूप आवडायचे. इथे बन बनविले आहे. हाहाहाहा मात्र काय अप्रतिम आणि तणावमुक्त ते दिवस होते.
2002 मध्ये पहिल्यांदा ‘संडे टेंगो’ हा स्टार प्लस वाहिनीवरील शो होस्ट करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. यानंतर झी म्युझिक वाहिनीसाठी व्हीजे म्हणून त्याने काम केले. रेडिओ सिटी या रेडिओ वाहिनीवर मनीषने रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले आणि बघता बघता छोट्या पडद्यावरचा नंबर 1 होस्ट बनला. पुढे अभिनयक्षेत्रातही तो आला.
स्टार वन वाहिनीवरील ‘घोस्ट बना दोस्त’ या मालिकेत मनीषने भूताची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘जिंदादिल‘, ‘श२२२२ फिर कोई है’,‘कहानी शुरू विथ लव गुरू’ या मालिकांमध्ये अभिनय केला.
लवकरच त्याला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. अक्षय कुमार आणि कतरीना कैफ स्टारर ‘तीस मार खान’ तो झळकला. 2013 मध्ये ‘मिकी वायरस’ या सिनेमात तो लीड हीरो म्हणून तो दिसला.