खाली डोकं वर पाय… वयाच्या 49व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत मंदिरा बेदी भल्याभल्यांना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 17:29 IST2021-05-22T17:25:54+5:302021-05-22T17:29:42+5:30

योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा मंदिराचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

Mandira Bedi flaunts killer abs, pulls off 10 handstands and we are inspired | खाली डोकं वर पाय… वयाच्या 49व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत मंदिरा बेदी भल्याभल्यांना देते टक्कर

खाली डोकं वर पाय… वयाच्या 49व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत मंदिरा बेदी भल्याभल्यांना देते टक्कर

कलाकार मंडळींचं शेड्युअल खूप बिझी असतं. त्यातूनही ते वर्कआऊटसाठी वेळ काढत नित्यनियमाने व्यायाम करतात. कलाकारांना स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असतं. त्यामुळे काही कलाकार फिट राहण्यासाठी वर्कआऊट करत जिममध्ये घाम गाळतात. तर काही कलाकार विविध योगासनं करतात. फिटनेसबाबत सजग असलेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. वाढत्या वयातही तारुण्य टिकवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मंदिरा बेदीचेही नाव घेतले जाते. वयाच्या 49व्या वर्षीही फिटनेसवर बरंच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते.

योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा मंदिराचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत तिचे खाली डोकं वर पाय केलेत. याचाच अर्थ ती शीर्षासन करत असतानाचा पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. या वयातही फिटनेसच्या बाबतीत ती भल्याभल्यांना टक्कर देत असल्याचे पाहायला मिळतंय.

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिरा मुलं झालं. मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या करारांनी मला प्रेग्नेंट होऊ दिसे नाही. मला भीती होती की जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझं करिअर संपले. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. मंदिरा प्रभासच्या 'साहो'मध्ये दिसली होती. यात तिने नेगेटीव्ह शेड् होती.

एका मुलाखतीत तिने आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. मंदिराने सांगितले होते की, करिअरमुळे जवळपास 12 वर्षे ती आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण मनोरंजन जगात महिलांचे करिअर जास्त मोठं नसतं.

टिव्ही आणि सिनेमांमध्ये जास्त काम करणाऱ्या महिलांबाबत मला असुरक्षिततेची भावना मनात निर्माण झाली होती. मंदिरा बेदी दोन मुलांची आई आहे ९ वर्षाचा मुलगा राज आणि ४ वर्षाची मुलगी तारा आहे. लॉकडाऊनमध्ये दोघांसोबत मस्त एन्जॉय  करताना दिसते.

Web Title: Mandira Bedi flaunts killer abs, pulls off 10 handstands and we are inspired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.