'आज आपल्या लग्नाचा..', पती राज कौशलच्या आठवणीत भावूक झाली मंदिरा बेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:33 PM2022-02-14T12:33:01+5:302022-02-14T16:32:43+5:30

मंदिराने ही पोस्ट पती राज कौशल (Raj Kaushal)बद्दल लिहिली आहे, जो आता या जगात नाही.

Mandira bedi emotional instagram post valentines day raj kaushal wedding anniversary | 'आज आपल्या लग्नाचा..', पती राज कौशलच्या आठवणीत भावूक झाली मंदिरा बेदी

'आज आपल्या लग्नाचा..', पती राज कौशलच्या आठवणीत भावूक झाली मंदिरा बेदी

googlenewsNext

Mandira Bedi Remembers Raj Kaushal: बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध अँकर-होस्ट मंदिरा बेदीने (Mandira Bedi)  व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) च्या निमित्ताने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. मंदिराने ही पोस्ट पती राज कौशल (Raj Kaushal) बद्दल लिहिली आहे, जो आता या जगात नाही. राजसोबतचे लग्नाचे फोटो शेअर करत मंदिराने लिहिले की, “आज आपल्या लग्नाचा 23 वा वाढदिवस होता. 

राज आणि मंदिराचे लग्न 1999 मध्ये झाले होते. दोघांनी लग्नासाठी १४ फेब्रुवारीचा दिवस निवडला होता. त्यांची पहिली भेट 1996 मध्ये चित्रपट निर्माते मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. राज मुकुलचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना मंदिरा तिथे ऑडिशनसाठी गेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा मंदिरा आणि राजने तीन वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मंदिराच्या कुटुंबाला तो मान्य नव्हते.

राजच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हते, पण सगळ्यांनी समजूत काढल्यानंतर दोघांनीही अखेर लग्न केलं होतं. लग्नाच्या 12 वर्षानंतर दोघेही एका मुलाचे आई-बाबा झाले. यानंतर तिने २०२० मध्ये एक मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव तारा आहे. गेल्या वर्षी 30 जून रोजी वयाच्या 49 व्या वर्षी राजचे अचानक निधन झाले तेव्हा मंदिराला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. राजचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

राज हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होता. त्याने 'प्यार में कभी कभी', 'शादी का लड्डू' आणि 'एंथनी कौन है' सारखे चित्रपट तयार केले होते. त्याचबरोबर मंदिराने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शांती या मालिकेतून ती घरोघरी पोहोचली.

Web Title: Mandira bedi emotional instagram post valentines day raj kaushal wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.