वर्षाच्या शेवटच्या दिवशी बोल्ड झाली मल्लिका शेरावत, बिकीनीत खास पोज देत फोटो केला शेअर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:33 IST2021-12-31T15:31:04+5:302021-12-31T15:33:44+5:30
Mallika Sherawat Bikini Photo : फोटोत मल्लिका शेरावत बिकीनी घालून एका खुर्चीत आराम करताना दिसत आहे. ती सनबाथ घेत आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे फॅन्स फिदा झाले आहेत.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी बोल्ड झाली मल्लिका शेरावत, बिकीनीत खास पोज देत फोटो केला शेअर...
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) ने 'मर्डर' सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मीसोबत बोल्ड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. ती केवळ पडद्यावरच नाही तर रिअल लाइफमध्येही बोल्ड आहे. याचा पुरावा तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर मिळतो. मल्लिकाने वर्षाच्या अखेरच्या दिवशी एक असा फोटो शेअर केला जो आता व्हायरल झाला आहे.
फोटोत मल्लिका शेरावत बिकीनी घालून एका खुर्चीत आराम करताना दिसत आहे. ती सनबाथ घेत आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे फॅन्स फिदा झाले आहेत. मल्लिकाच्या या बोल्ड अंदाजाचं फॅन्स कौतुक करत आहेत. फॅन्स तिच्या सुंदरतेचं भरभरून कौतुक करत आहेत. फोटोवर लाइक्सचा पाऊस पडत आहे आणि शेअरही केला जात आहे.
मल्लिकाने तिचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला तिनं लिहिलं की, '२०२१ चा शेवटचा दिवस. नवीन वर्ष माझ्या इन्स्टा फॅमिलीसाठी शानदार ठरो. या फोटोवर एका फॅनने कमेंट करत लिहिलं की, तू फार हॉट दिसत आहे. अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स फॅन्सनी केल्या आहेत.
वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर मल्लिका शेरावत अखेरची २०१९ मध्ये आलेली सीरिज 'बू सबकी फटेगी' मध्ये दिसली होती. ही एक हॉरर-कॉमेडी होती. याचं दिग्दर्शन फरहाद सामजीने केलं होतं. रिपोर्टनुसार, मल्लिका लवकरच साऊथ सिने इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे. ती 'नागमति' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिलीज होणार आहे.