मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:41 IST2025-12-20T13:40:47+5:302025-12-20T13:41:44+5:30
Mallika Sherawat White House Christmas dinner: बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ख्रिसमस डिनरचा आनंद घेतला.

मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ख्रिसमस डिनरचा आनंद घेतला. अधिकृत निमंत्रण मिळाल्यानंतर तिला व्हाईट हाऊसमध्ये आयोजित या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. 'मर्डर' फेम अभिनेत्रीने या ग्रँड सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपला अनुभव शेअर केला आहे.
मल्लिका शेरावतने नुकतेच तिच्या चाहत्यांसाठी व्हाईट हाऊसमधील एक झलक शेअर केली, ज्यामध्ये ती डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस डिनरचा आनंद घेताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ''व्हाईट हाऊसच्या ख्रिसमस डिनरसाठी आमंत्रित केले जाणे हे खरोखर अविश्वसनीय आहे, मी खूप कृतज्ञ आहे.''
पिंक रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली अभिनेत्री
एका फोटोमध्ये मल्लिका व्हाईट हाऊसच्या बाहेर पोज देताना दिसत आहे. तिने पिंक रंगाचा अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता. त्यावर पांढऱ्या रंगाचे फर जॅकेट घेतले होते. तिने आपला लूक एका साध्या क्लच बॅगने आणि नॅचरल हेअरस्टाईलने पूर्ण केला होता. तिने निमंत्रण पत्रिकेच्या फोटोंसोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
मल्लिका शेरावत वर्कफ्रंट
मल्लिकाने २००३ मध्ये गोविंद मेनन यांच्या 'ख्वाहिश' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिला खऱ्या अर्थाने ओळख २००४ मध्ये आलेल्या अनुराग बसूंच्या 'मर्डर' चित्रपटामुळे मिळाली. त्यानंतर तिने 'प्यार के साइड इफेक्ट्स' (२००६), 'वेलकम' (२००७), 'डर्टी पॉलिटिक्स' (२०१५) आणि 'आरके/आरके' (२०२२) यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. ती शेवटची राज शांडिल्य दिग्दर्शित 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीसोबत दिसली होती.