मल्लिका शेरावत संतापली! म्हणे, अफवा पसरवू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:56 IST2018-01-10T10:24:54+5:302018-01-10T15:56:27+5:30
बॉलिवूडमधून दीर्घकाळापासून गायब असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत भलतीच संतापली आहे. खरे तर मल्लिका सध्या भारतात कमी अन्् फ्रान्समध्येचं अधिक ...

मल्लिका शेरावत संतापली! म्हणे, अफवा पसरवू नका!
ब लिवूडमधून दीर्घकाळापासून गायब असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत भलतीच संतापली आहे. खरे तर मल्लिका सध्या भारतात कमी अन्् फ्रान्समध्येचं अधिक असते. पण तरिही तिच्याबद्दलच्या बातम्या भारतात चघळल्या जातातच. अर्थात मल्लिकालाही हे हवे आहेच. कारण शेवटी चर्चेत राहायला कुणाला आवडणार नाही. पण चर्चा सकारात्मक असू शकते तशीच नकारात्मकही असू शकते. सध्या मल्लिकासंदर्भात जरा नकारात्मक चर्चा कानावर येते आणि यामुळेच मल्लिकाचा पारा चढला आहे. मल्लिका आणि तिचा फ्रेन्च बॉयफ्रेन्ड साइरिल आॅक्जेनफेन्स या दोघांना त्यांच्या पॅरिसच्या घरमालकाने घरातून हाकलून दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी कानावर आली होती. आज पुन्हा या वृत्ताला दुजोरा देणारी बातमी आली. कोर्टाने म्हणे, मल्लिका व तिच्या बॉयफ्रेन्डला पॅरिसचे ते अपार्टमेंट खाली करण्याचे आदेश दिले आहेत. घरमालकाच्या दाव्यानुसार, मल्लिकाने फक्त एकदाच 2715 यूरोचे भाडे दिले होते. त्यानंतर तिने एकही पैसा दिला नाही.
नेमक्या याच बातमीने मल्लिकाचे माथे ठणकले आहे. मी आधीही सांगितलेय,पुन्हा एकदा सांगतेय की, माझे पॅरिसमध्ये ना घर आहे ना मी तिथे भाड्याने राहते. मी लॉस एंजिल्समध्ये राहत होती आणि गेल्या आठ महिन्यांपासून भारतात आहे. तेव्हा नाहक अफवा पसरवू नका, असा खुलासा मल्लिकाने केला आहे.
मल्लिका दीर्घकाळापासून साइरिलसोबत राहत आहेत. या दोघांनीही सीक्रेट मॅरेज केल्याची चर्चा मध्यंतरी होती. अर्थात मल्लिकाने या सगळ्या चर्चा अफवा असल्याचे सांगत अफवा पसरवणे बंद करा, असे म्हटले होते. ज्यादिवशी मी लग्न करेल, त्यादिवशी मी सर्वांना निमंत्रित करेल, असेही तिने स्पष्ट केले होते.
ALSO READ : मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला कोर्टाने दिला झटका, घर खाली करण्याचे दिले आदेश
मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर २०१६ मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती. ‘मर्डर गर्ल’ नावाने प्रसिद्ध झालेली मल्लिका ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’,‘गुरू’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केलेय.