फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केलं होतं मल्लिका शेरावतनं लग्न? २ वर्षानंतर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 19:55 IST2019-06-28T19:55:04+5:302019-06-28T19:55:30+5:30
मर्डर, ख्वाहिश, हिस यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे.

फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केलं होतं मल्लिका शेरावतनं लग्न? २ वर्षानंतर केला खुलासा
मर्डर, ख्वाहिश, हिस यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे. मल्लिका 'बू सबकी फटेगी' या वेबसीरिजमध्ये पहायला मिळणार आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम लगावला आहे. मल्लिकानं सांगितलं की, तिने लग्न केलेलं नसून ती सिंगल आहे.
टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार मल्लिका शेरावत हिने मुलाखतीत सांगितलं की, मी लग्न केलेलं नाही. लोक अफवांवर विश्वास ठेवतात ही खूप वाईट बाब आहे. माझा हा खासगी अनुभव आहे. यापूर्वी देखील मी एका वर्तमानपत्राच्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.
तिने पुढे म्हटलं की, मी त्या मुलाखतीत सांगितलं होतं की गेल्या आठ महिन्यांपासून मी पॅरिसला गेले नाही. ही गोष्ट खरी असल्याचे दाखवण्यासाठी मी माझा पासपोर्टदेखील दाखवला. असे असतानाही मला एका फ्रेंच मुलाला डेट करत असल्याचं म्हणत का टार्गेट केलं.
२०१७ साली आलेल्या वृत्तानुसार, मल्लिका शेरावत व तिचा फ्रेंच बॉयफ्रेंड साइरिल ऑक्सनफैंस यांनी गुपचुप विवाह केला होता.
मल्लिका व साइरिल यांना पॅरिसमधील घर रिकामे करण्याचे आदेश दिले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्लिका बॉयफ्रेंडसोबत पॅरिसमधील १६ एरांडिस्मेंट अपार्टमेंटमध्ये राहत होती. दोघांनी वेळेवर भाडे दिले नव्हते. त्यामुळे कोर्टाने घर खाली करण्याचा आदेश दिला होता.