मल्लिका करणार टीकाकारांचे तोंड बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 13:42 IST2016-06-29T06:51:19+5:302016-06-29T13:42:25+5:30
बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरवत हिंदी सिनेमापासून जरी दूर असली तरी ती अधिक वेळ लॉस एंजलिस येथे घालवते. सध्या ती ...

मल्लिका करणार टीकाकारांचे तोंड बंद
सध्या ती ‘टाईम रेडर्स’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. ती म्हणते, माझा हा चित्रपट माझ्यावर सतत टीका करणाऱ्यांना एक चपराक असेल. या तुफान अॅक्शनपटात माझे काम पाहून लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल याचा मला विश्वास आहे.
हाँगकाँग येथील दिग्दर्शक डॅनियल ली यांनी हा चित्रपट बनवला असून बिग बजेट, सुपर स्पेशल इफेक्ट्स, जबरदस्त अॅक्शन आणि तगडी स्टार कास्टमुळे आतुरतेने लोक वाट पाहत आहे.
चीनमध्ये बेस्टसेलर ठरलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.
ती सांगते, शुन्य डिग्री सेल्सियस तापमानात आम्ही शुटिंग करत केली. अशा चित्रपटाला मी नाही म्हणूच शकत नव्हते. आता मल्लिकाचे म्हणने खरे ठरते का हे तर चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.