“बहीण आणि आई बाहेर होत्या, काचेच्या खोलीत त्याने मला मागून पकडलं अन्…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 12:58 IST2023-04-13T12:27:20+5:302023-04-13T12:58:58+5:30

मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही.

Malayalam actress malavika sreenath shares her horrifying casting couch experience in audition | “बहीण आणि आई बाहेर होत्या, काचेच्या खोलीत त्याने मला मागून पकडलं अन्…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

“बहीण आणि आई बाहेर होत्या, काचेच्या खोलीत त्याने मला मागून पकडलं अन्…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवीन नाही. अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. मल्याळम अभिनेत्री मालविका श्रीनाथ हिने अलीकडेच तिचा कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. तीन वर्षांपूर्वी एका चित्रपटात अभिनेत्री मंजू वारियरच्या मुलीच्या भूमिकेसाठी तिला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. 

अलिकडेच एका मल्याळम वाहिनीला दिसेल्या मुलाखतीत मालविकाने खुलासा केला की, एका चित्रपटासाठी ऑडिशन देत असताना तिला एका खोलीत एका माणसाने अडवले. ती म्हणाली, “मला तीन वर्षांपूर्वी ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. हे ऑडिशन मंजू वारियरच्या मुलीच्या भूमिकेसाठी होते. ज्या लोकांनी माझे ऑडिशन दिले ते या चित्रपटाचा भाग नव्हते हे मला नंतर कळले. मी ही आमिषाला बळी पडले आणि तिथे ऑडिशन देण्यास पोहोचले. मंजू वारियरसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित होते. 

तिची बहीण आणि आई तिच्यासोबत त्रिशूरमध्ये झालेल्या ऑडिशनसाठी सोबत आल्या होत्या. ती पुढे म्हणाली, “ती खोली काचेची होती. ऑडिशननंतर तिला ड्रेसिंग रूममध्ये जाऊन तिचे केल ठीक करण्यास सांगितले. “मी खोलीत केस नीट करत होते तेव्हा तो आला आणि मला मागून पकडले तो एक धिप्पाड माणूस होता.”

"तो माझ्या परिस्थितीचा फायदा घेत होता. तो म्हणाला, 'तुला काहीही करण्याची गरज नाही. तुझ्या आई आणि बहिणीला बाहेर बसू द्या. तुला फक्त 10 मिनिटे इथे उभे राहण्याची गरज आहे.' मी रडू लागले. काय करावं तेच कळत नव्हतं. त्या व्यक्तीकडे कॅमेरा होता जो तो शूट करण्यासाठी वापरत होता. मी त्याच्या हातातून कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचं लक्ष तिकडे जाताच मी खोलीतून निघून गेले.” असा धक्कादायक अनुभव तिने सांगितला.  मालविकाने आतापर्यंत ‘मधुरम’ व ‘सॅटरडे नाइट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती ‘कासारगोल्ड’ चित्रपटात दिसणार आहे.

 

Web Title: Malayalam actress malavika sreenath shares her horrifying casting couch experience in audition