वडिलांच्या निधनाच्या २० दिवसानंतर मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 11:07 IST2024-10-01T11:06:32+5:302024-10-01T11:07:31+5:30

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबासाठी सप्टेंबर महिना खूप कठीण होता. वडील अनिल मेहता यांनी घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Malaika Arora's first post shared 20 days after her father's death | वडिलांच्या निधनाच्या २० दिवसानंतर मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट

वडिलांच्या निधनाच्या २० दिवसानंतर मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि तिच्या कुटुंबासाठी सप्टेंबर महिना खूप कठीण होता. वडील अनिल मेहता यांनी घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनाने हादरलेल्या या अभिनेत्री सोशल मीडियापासून पूर्णपणे दुरावले होते. अपघातानंतर जवळपास २० दिवसांनी मलायकाने तिची पहिली पोस्ट शेअर केली.

'छैय्या छैय्या गर्ल' मलायका अरोराने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये लिहिले आहे की, 'स्कॉर्पीन ऑक्टोबर तुझ्यासाठी चांगला असेल.' या महिन्यात अभिनेत्रीचा वाढदिवसही आहे. मलायका अरोरा २३ ऑक्टोबरला ५१ वर्षांची होणार आहे. 

गेल्या महिन्यात वडील अनिल मेहता यांच्या निधनामुळे मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोरा यांना धक्का बसला आहे. या कठीण काळात त्यांच्या जवळच्या मैत्रिणी करीना कपूर आणि करिश्मा कपूर त्यांच्यासोबत होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना कपूरने तिच्या जवळच्या मैत्रिणीला कठीण काळात साथ देण्यासाठी तिच्या प्रोजेक्टच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या.

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान अर्जुनही झाला स्पॉट
मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाची बातमी समोर येताच मलायकाच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी गर्दी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला मीडिया रिपोर्ट्समध्ये अर्जुन कपूर आणि मलायका यांचे ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात येत होता, मात्र अभिनेत्रीच्या वडिलांच्या निधनानंतर अर्जुन कपूर लगेच मलायकाच्या घरी पोहोचला होता.

एक्स पती अरबाज खानही आला धावून
मलायका अरोराचा एक्स पती अरबाज खान देखील घटनास्थळी दाखल झाला होता. अनिल मेहता यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तिच्या घरी पोहोचणारा पहिला व्यक्ती होता, अभिनेत्रीचा एक्स पती अरबाज खान.

Web Title: Malaika Arora's first post shared 20 days after her father's death