मलायका अरोराने पूलमध्ये एन्ट्री घेताच फॅन्स झाले फ्लॅट, फोटो फॅन्स म्हणाले - हाय गरमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:53 IST2022-03-16T17:52:06+5:302022-03-16T17:53:24+5:30

Malaika Arora : हा पूलमधील फोटो शेअर करत मलायकाने इन्स्टाग्रामवर जे कॅप्शन दिलं आहे त्यानेही फॅन्सचं लक्ष वेधलं जात आहे. याच्या कॅप्शनला मलायकाने लिहिलं 'हरवले'.

Malaika Arora's bold pool picture goes viral | मलायका अरोराने पूलमध्ये एन्ट्री घेताच फॅन्स झाले फ्लॅट, फोटो फॅन्स म्हणाले - हाय गरमी...

मलायका अरोराने पूलमध्ये एन्ट्री घेताच फॅन्स झाले फ्लॅट, फोटो फॅन्स म्हणाले - हाय गरमी...

मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फॅन्ससाठी दररोज तिचे खास फोटो शेअर करत असते. ज्यामुळे तिची चर्चाही होत असते. असाच एक हॉट आणि बोल्ड फोटो तिने शेअर केला आहे. इकडे उन्हाळ्याची सुरूवात झाली आणि मलायकाने स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केला. मलायकाचा यातील ड्रेसही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पण हा ड्रेस नेमका कसा आहे हे समजायला जरा वेळ जाईल.

मलायका अरोराने सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे त्यात ती ब्लॅक कलरच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. पण मोनोकिनीला अजून वेगळ्या स्टाइलने तयार करण्यात आलं आहे. पण यातही मलायका ग्लॅमरस दिसत आहे. हा पूलमधील फोटो शेअर करत मलायकाने इन्स्टाग्रामवर जे कॅप्शन दिलं आहे त्यानेही फॅन्सचं लक्ष वेधलं जात आहे. याच्या कॅप्शनला मलायकाने लिहिलं 'हरवले'.

काही दिवसांपूर्वीची मलायकाने एका गाउनमधील फोटो शेअर केले होते. या गाउनची किंमतही चर्चेत होती. हा ड्रेस पिस्ता कलरचा होता. हिंदुस्थान टाइम्सनुसार, Millia London वेबसाइटवर असलेला हा ड्रेस चांगलाच महागडा आहे. मलायकाचा हा ड्रेस २ लाख ४० हजार रूपयांचा आहे.

इतकंच नाही तर मलायका जे गोल्ड हील्स घातले आहेत त्यांची किंमतीही काही कमी नाही. रिपोर्ट्सनुसार, मलायकाने घातलेल्या हील्सची किंमत ८३ हजार रूपये आहे. 
 

Web Title: Malaika Arora's bold pool picture goes viral