मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर दिसली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहताच चाहते म्हणाले- "हा तर तोच कॉन्सर्टमधला मुलगा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:02 IST2025-11-27T12:01:51+5:302025-11-27T12:02:24+5:30
Malaika Arora Spotted: अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. आता नुकतंच तिला एअरपोर्टवर पाहण्यात आलं, जिथे ती पुन्हा एकदा तिच्या 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली.

मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर दिसली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहताच चाहते म्हणाले- "हा तर तोच कॉन्सर्टमधला मुलगा"
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बऱ्याच दिवसांपर्यंत ती 'टॉक ऑफ द टाऊन' बनली होती. आता पुन्हा एकदा एका मिस्ट्री मॅनमुळे मलायका अरोराचे नाव लाइमलाईटमध्ये आले आहे. नुकतंच तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं, जिथे ही अभिनेत्री तिच्या मिस्ट्री मॅनसोबत दिसली.
खरंतर, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जिथे मलायका अरोरा अगदी कॅज्युअल लूकमध्ये एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिच्यासोबत एक व्यक्ती होती, ज्याने मास्क लावला होता आणि त्याने आपला चेहरा दाखवला नाही. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या आणि प्रत्येकजण या मिस्ट्री मॅनबद्दल अंदाज लावत आहे.
''हा तर तोच कॉन्सर्टमधला मुलगा आहे...''
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांच्या कमेंट्स सुरू झाल्या. अनेकांनी अभिनेत्रीच्या प्रेमसंबंधांवर भाष्य केलं, तर काहींनी सांगितलं की, हा तोच कॉन्सर्टमधला व्यक्ती आहे, ज्याच्यासोबत मलायका अरोराचा व्हिडीओ आधी व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तिचा मिस्ट्री मॅन अभिनेत्रीसोबत 'ट्विनिंग' करताना दिसत आहे. जवळपास सर्वच युजर्स फक्त हीच कमेंट करताना दिसले की, हा तोच व्यक्ती आहे, ज्याच्यासोबत ही अभिनेत्री कॉन्सर्टमध्ये दिसली होती. तर दुसरीकडे, एका युजरने टॅब्लॉइड्सचा हवाला देत या व्यक्तीचं नावही उघड केलं आहे. त्यांनी या मिस्ट्री मॅनचं नाव हर्ष असल्याचं सांगितलं.
कॉन्सर्टमध्ये दिसले होते दोघे
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अरोरा बऱ्याच काळापासून एकटी राहत होती. पण नुकतंच मुंबईत ग्रॅमी अवॉर्ड विजेता गायक एनरिक इग्लेसियसचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. जिथे मलायका अरोरा एका मुलासोबत दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, ही व्यक्ती डायमंड व्यावसायिक हर्ष मेहता आहे. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होता आणि लोक दावा करू लागले की, हा व्यक्ती अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे.