मलायका अरोराची 'मिस्ट्री मॅन'सोबत आदिनाथ जैन मंदिराला भेट; पन्नाशीत पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 17:54 IST2026-03-30T17:53:53+5:302026-03-30T17:54:39+5:30
अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीतही डेटिंग लाईफमुळे चर्चेत असते.

मलायका अरोराची 'मिस्ट्री मॅन'सोबत आदिनाथ जैन मंदिराला भेट; पन्नाशीत पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा
अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीतही डेटिंग लाईफमुळे चर्चेत असते. आधी मलायका-अर्जुन कपूर यांचं अफेअर चर्चेत होतं. दोघं अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि लग्नही करणार होते. मात्र दोन वर्षांपूर्व त्यांचं नातं तुटलं. यानंतर मलायकाचं नाव व्यावसायिक हर्ष मेहता याच्यासोबत जोडलं जात आहे. मुंबईतील एका कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसल्यापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यातच आता मलायका पुन्हा एकदा हर्षसोबत दिसून आली.
मलायका आणि हर्ष हे एकत्र राजस्थानमधील आदिनाथ जैन मंदिर येथे दर्शनासाठी गेल्याचं समोर आलं आहे. पाली जिल्ह्यातील नरलाई गावात असलेल्या या ऐतिहासिक मंदिरात मलायका येताच तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. या वेळी मलायका पांढऱ्या रंगाच्या सलवार-सूटमध्ये दिसली, तर हर्ष ब्लॅक शर्ट आणि मेहंदी रंगाच्या पॅन्टमध्ये दिसला. दोघांनी चाहत्यांसोबत संवाद साधत फोटोही काढले. मंदिरात त्यांनी पूजा-अर्चाही केली. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे दोघांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
मलायका आणि हर्षमध्ये तब्बल १९ वर्षांचं अंतर आहे. मलायका ५२ वर्षांची आहे तर हर्ष ३३ वर्षांचा आहे. मलायका अरोराने १९९८ मध्ये सलमान खानचा भाऊ अरबाज खानशी लग्न केले होते. पण, काही वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये त्यांचा संसार मोडला आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना अरहान हा मुलगा आहे.