अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर मलायकाने घेतला 'हा' मोठा निर्णय, ऐकताच खान कुटुंबीयांना ही बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:33 IST2018-08-30T15:12:44+5:302018-08-30T15:33:35+5:30
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतेच दोघे लॅक्मे फॅशन वीक 2018मध्ये दोघे एकत्र बसलेले दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर मलायकाने घेतला 'हा' मोठा निर्णय, ऐकताच खान कुटुंबीयांना ही बसेल धक्का
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतेच दोघे लॅक्मे फॅशन वीक 2018मध्ये दोघे एकत्र बसलेले दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. या इव्हेंटमधला मलायका आणि अर्जुनचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
याआधी दोघांच्या अफेअरने कपूर आणि खान कुटुंबीयमध्ये धुमकुळ माजला होता. मीडिया रिपोर्टनुसार मलायकाला आपेल अर्जुनसोबतचे नातं ऑफिशियली करायचे आहे. मलायकाने दोन वर्षांआधी अरबाजपासून वेगळी झाली.
मलायकाचे अरबाजपासून वेगळे होण्याचे कारण अर्जुनला मानले जाते. ज्यावेळी सलमानला मलायका आणि अर्जुनच्या नात्याबाबत कळले तेव्हा तो खूप नाराज झाला होता. तर अर्जुनचे वडील बोनी कपूर यांचादेखील या नात्याला विरोध होता. बोनी यांना भीती होती की अर्जुनने सलमान पंगा घेतला तर त्याचा परिणाम अर्जुनच्या करिअरवर होईल. बोनी यांचा सल्ला ऐकून अर्जुनने मलायकासोबत सार्वजनिक ठिकाणी भेटणं बंद केले. मागच्या एका वर्षांपासून दोघं कोणत्याच इव्हेंटमध्ये एकत्र दिसले नाहीत.
आता जेव्हा अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतोय. दोघांचे फोटोदेखील सोशल मीडियावर दिसतायेत. त्यामुळे आता मलायकाला ही वाटतेय की अर्जुन आणि तिचे नातं लपवण्याची गरज नाही. एका इंटरव्हु दरम्यान मलायका म्हणाली होती की, अर्जुन माझा खूप चांगला मित्र आहे मात्र लोक आमच्या नात्याला चुकीचे नाव देतात जे बरोबर नाहीय.
लवकरचं अर्जुनचे ‘नमस्ते इंग्लंड’, ‘संदीप और पिंकी फरार’ हे दोन चित्रपट रिलीज होत आहेत. तर मलायका विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’मध्ये आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे.