मलायका अरोराने बर्थडेला एकटीनेच डान्स फ्लोअरवर घातला होता धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 16:31 IST2021-04-15T16:06:30+5:302021-04-15T16:31:08+5:30
Malaika arora throwback dance video viral : या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला डान्स करताना दिसतेय.

मलायका अरोराने बर्थडेला एकटीनेच डान्स फ्लोअरवर घातला होता धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल
मलायका अरोराचा (Malaika Arora )डान्स व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला डान्स करताना दिसतेय. मलायकाचा हा डान्स व्हिडीओ 2019 च्या बर्थ डे पार्टीमधला आहे. यातील डान्स मुव्ह्जमुळे अभिनेत्रीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेत आला आहे. मलायकाने या डान्स पार्टीत खूप धमाल केली होती त्याचा पार्टी दरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मलायका अरोरा बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी चित्रपटांपासून खूप दूर असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ४७ वर्षीय मलायका अरोरा नेहमी इव्हेंट्स किंवा एअरपोर्टवरील वेगवेगळ्या लूकमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. इतकेच नाही तर मलायका आपल्या फिटनेस आणि अर्जुनसोबतच्या रिलेशनशीपमुळेही बऱ्याचदा चर्चेत येत असते.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मलायकाने स्वत:चे दोन फोटो शेअर केले होते आणि यानंतर मलायका व अर्जुनची एन्गेजमेंट झाल्याची चर्चा सुरु झाली. या फोटोत मलायकाच्या बोटातील रिंग स्पष्ट दिसतेय. ‘किती सुंदर अंगछी आहे. मला ही खूप आवडते. येथून आनंदाला सुरूवात होते. आयुष्यातल्या प्रेमासाठी काही प्लान असेल तर ही साखरपुड्याची अंगठी एकदम मस्त आहे,’ असे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये मलायकाने लिहिले. मलायकाच्या या पोस्टनंतर तिने व अर्जुनने साखरपुडा केल्याची चर्चा सुरू झाली. चाहत्यांनी मलायकावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला होता., तूर्तास तरी मलायका व अर्जुनने एन्गेजमेंटबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.