"अरबाज एक चांगला व्यक्ती पण...", एक्स पतीच्या 'या' गोष्टी मलायकाला आवडत नाहीत, लेकाला म्हणाली- तूदेखील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 13:20 IST2024-04-18T13:18:15+5:302024-04-18T13:20:10+5:30

अरबाजच्या 'त्या' गोष्टीची मलायकाला यायची चीड, स्वत:च केला खुलासा

malaika arora talk about ex husband arbaaz khan said son arhaan is just like him | "अरबाज एक चांगला व्यक्ती पण...", एक्स पतीच्या 'या' गोष्टी मलायकाला आवडत नाहीत, लेकाला म्हणाली- तूदेखील...

"अरबाज एक चांगला व्यक्ती पण...", एक्स पतीच्या 'या' गोष्टी मलायकाला आवडत नाहीत, लेकाला म्हणाली- तूदेखील...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मलायकाने नुकतंच लेक अरहान खानचा शो डंब बिरयानीमध्ये हजेरी लावली होती. या शोचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अरहान मलायकाला वडील अरबाज खानबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. एक्स पती अरबाज खानबद्दल प्रश्न विचारताच मलायकाही लेकाच्या प्रश्नाला उत्तर देते. 

मलायकाला अरहान अरबाजच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या आवडत नाहीत, याबाबत प्रश्न विचारतो. त्यावर उत्तर देत मलायका म्हणते, "तुझे हावभाव अगदी त्याच्यासारखेच आहेत. तुझं व्यक्तिमत्वही आकर्षित करणारं नाही. तू तुझ्या वडिलांसारखा आहेस. तूदेखील तुझ्या वडिलांप्रमाणेच निर्णय घेऊ शकत नाहीस. ज्या गोष्टीची मला चीड आहे. कोणते कपडे घालायचे आणि काय खायचं, हेदेखील तुम्ही ठरवू शकत नाही."

पुढे अरबाजच्या चांगल्या सवयींबद्दली मलायका सांगते. "अरबाज एक चांगला व्यक्ती आहे. तो कधीच ओव्हर रिअॅक्ट करत नाही. काही गोष्टींसाठी तो एकदम क्लिअर असतो. आणि तूदेखील या गोष्टींमध्ये वडिलांसारखाच आहेस," असंही मलायका पुढे म्हणाली. 

मलायका आणि अरबाज खानने १९९८ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. सुखी संसाराच्या तब्बल १९ वर्षांनी २०१७मध्ये ते घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज चर्चेत असतात. घटस्फोटानंतर दोघांनीही त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशवशिपमध्ये आहे. तर अरबाजने काही महिन्यांपूर्वीच शूराशी निकाह करत नव्याने संसार थाटला आहे. 

Web Title: malaika arora talk about ex husband arbaaz khan said son arhaan is just like him