Ex बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी मलायकाला अजूनही आहेत फिलिंग्स? म्हणाली- "तो माझ्या आयुष्यातील..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:10 IST2026-01-14T10:09:31+5:302026-01-14T10:10:04+5:30
अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे लिव्ह इनमध्येदेखील राहत होते. मात्र काही वर्षांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता पहिल्यांदाच मलायकाने अर्जुन कपूरबद्दल भाष्य केलं आहे.

Ex बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी मलायकाला अजूनही आहेत फिलिंग्स? म्हणाली- "तो माझ्या आयुष्यातील..."
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाइफमुळे कायमच चर्चेत असल्याचं दिसतं. मलायकाच्या बॉलिवूड करियरपेक्षा तिच्या लव्ह लाइफची जास्त चर्चा रंगली. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे लिव्ह इनमध्येदेखील राहत होते. मात्र काही वर्षांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता पहिल्यांदाच मलायकाने अर्जुन कपूरबद्दल भाष्य केलं आहे.
नम्रता जकारियाला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, "सुख आणि दु:ख हे आयुष्याचा भाग आहेत. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी राग, निराशा याचा सामना करावा लागतो. पण वेळनुसार गोष्टी बदलतात. वेळ सगळं काही ठीक करते. अर्जुन माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. मी माझा भूतकाळ किंवा भविष्याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. याबद्दल आधीही खूप बोललं गेलं आहे. लोकांना सेलिब्रिटींच्या आयुष्यात डोकवायची सवय झाली आहे. जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्हाला हे सगळं सहन करण्यासाठी तयार असलं पाहिजे".
मलायकाने १९९८ मध्ये अरबाज खानशी लग्न करत संसार थाटला होता. त्यांना अरहान हा मुलगादेखील आहे. २०१७ मध्ये मलायका आणि अरबाज घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. २०२४ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. तर अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत दुसरं लग्न केलं आहे. त्यांना एक मुलगीदेखील झाली आहे.