मलायकाचं Shoe कलेक्शन पाहिलंय का? चप्पलांनी भरलीये आख्खी रुम; फोटो पाहून जाल चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 16:54 IST2022-01-21T16:54:03+5:302022-01-21T16:54:41+5:30
Malaika arora: सध्या सोशल मीडियावर फिटनेस फ्रीक असलेल्या मलायकाच्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

मलायकाचं Shoe कलेक्शन पाहिलंय का? चप्पलांनी भरलीये आख्खी रुम; फोटो पाहून जाल चक्रावून
वय हा केवळ आकडा असतो हे अभिनेत्री मलायका अरोराकडे (malaika arora) पाहिलं जातं. मलायकाच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या पर्सनल लाइफची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. यात तिच्या लव्ह लाइफपासून ते ग्लॅमरस जीवनशैलीपर्यत प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच सध्या मलायकाच्या Shoe कलेक्शनचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मलायकाकडे असलेल्या वेगवेगळ्या चप्पल, शूजचं तिने केलेलं कलेक्शन पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एक आख्खी रुम तिने खास शूजसाठी केली आहे.
सध्या सोशल मीडियावर फिटनेस फ्रीक असलेल्या मलायकाच्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिचं वॉर्डरोब दिसत आहे. यात तिच्या कपड्यांसोबतच शूजचं कपाटही दिसून येत आहे. मलायकाच्या या कपाटाचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
मलायकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची संपूर्ण रूम दिसत आहे. यात एका बाजूला चप्पलांचं मोठं कपाट आहे. तर दुसरीकडे तिचं वॉर्डरोब आहे. हा फोटो शेअर करत तिने "My closet" असं कॅप्शन दिलं आहे. तसंच नवीन पोस्ट लवकरच येते असंही त्यात नमूद केलं आहे.
दरम्यान, मलायका कायमच तिच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस लूकसाठी चर्चेत येत असते. यात अनेकदा तिच्या महागड्या कपड्यांची चर्चा होते. मलायकाला कपडे, शूज आणि बॅग्सची विशेष आवड असल्याचं सांगण्यात येत.