"विषारी लोकांपासून दूर राहायचंय", अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 10:27 IST2024-11-13T10:26:26+5:302024-11-13T10:27:38+5:30

Malaika Arora : मलायका अरोराने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने नोव्हेंबर महिन्यात ती काय करणार आहे हे सांगितले.

Malaika Arora Shares Post After Breakup With Arjun, 'Stay Away From Toxic People' | "विषारी लोकांपासून दूर राहायचंय", अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने शेअर केली पोस्ट

"विषारी लोकांपासून दूर राहायचंय", अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने शेअर केली पोस्ट

अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora)चे वैयक्तिक आयुष्य सतत चर्चेत असते. अभिनेत्री अर्जुन कपूर(Arjun Kapoor)सोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होती. मात्र आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. नुकतेच अर्जुन कपूरने सांगितले होते की तो सिंगल आहे. दरम्यान, मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. मलायकाने या पोस्टमध्ये सांगितले की ती आता विषारी लोकांपासून दूर राहणार आहे.

मलायका अरोराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ही नोव्हेंबरची आव्हाने आहेत. सर्वात पहिले, दारू नाही. दुसरे ८ तास झोप. तिसरे, मार्गदर्शकाची गरज आहे. चौथे, दररोज व्यायाम करणे. पाचवे, दररोज १० हजार पावले. सहावे, सकाळी १० वाजेपर्यंत उपवास. सातवे म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न टाळणे. आठवे: रात्री ८ नंतर अन्न नाही. नववे, विषारी लोकांपासून दूर राहणे.

२०१८ साली मलायका आणि अर्जुन आले रिलेशनशीपमध्ये
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी २०१८ मध्ये डेट करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी आपले नाते गुप्त ठेवले. पण नंतर त्यांनी ते जाहीर केले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचे नाते अधिकृत केले. दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. दिवाळी पार्टीपासून फॅमिली गॅदरिंगपर्यंत मलायका आणि अर्जुन एकत्र दिसले. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. दोघांच्या वयात १२ वर्षांचे अंतर होते. पण आता दोघेही एकत्र नाहीत. काही काळापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले.

वर्कफ्रंट
मलायका माझा येक नंबर या मराठी गाण्यात दिसली होती. अर्जुन कपूर सध्या सिंघम अगेन या चित्रपटात दिसत आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. या चित्रपटातील अर्जुन कपूरचा अभिनय चाहत्यांना खूप भावतो आहे.

Web Title: Malaika Arora Shares Post After Breakup With Arjun, 'Stay Away From Toxic People'