अखेर मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चेला पूर्णविराम, या व्हिडीओतून मिळाली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:22 IST2024-01-08T14:21:31+5:302024-01-08T14:22:11+5:30
Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत.

अखेर मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चेला पूर्णविराम, या व्हिडीओतून मिळाली हिंट
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या वृत्तांनी जोर धरला होता. तसेच नुकतेच सोशल मीडियावर मलायका अर्जुन संदर्भात दावा केला होता की, ते दोन महिन्यांपूर्वी वेगळे झाले होते. या दाव्यांच्या दरम्यान मलायकाने लव्ह बॉय अर्जुन कपूरसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
नुकतेच मलायका अरोराने इंस्टाग्राम स्टोरीवर अर्जुन कपूरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन कपूर त्याचा जवळचा मित्र रणवीर सिंगसोबत डीजे बनून मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत मलायकाने कॅप्शनमध्ये खूप कूल म्हटले आहे. हा व्हिडीओ अर्जुन मलायका यांच्या एका जवळचा मित्राच्या लग्न सोहळ्यातील आहे. या सोहळ्यात अर्जुन मलायका एकत्र दिसले होते.
या दरम्यान मलायका अरोराने अर्जुनसोबत वेगळे झाल्याच्या अफवांना पूर्णविराम लावला आहे. यासोबत त्यांच्यातील प्रेम कायम असल्याचा पुरावा दिला आहे. नुकतेच मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले की, दोन महिन्यांपूर्वी मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झालं होतं मात्र दोघांमधील मतभेद मिटले.