अरेच्चा...! न्यूयॉर्कमध्ये अर्जुनशिवाय मलायका एकटीच करतेय सुट्टी एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 20:17 IST2019-09-20T20:17:00+5:302019-09-20T20:17:00+5:30
मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या अफेयरच्या वृत्तामुळे चर्चेत आहे.

अरेच्चा...! न्यूयॉर्कमध्ये अर्जुनशिवाय मलायका एकटीच करतेय सुट्टी एन्जॉय
मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या अफेयरच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. दोघे नेहमी एकत्र दिसतात. वेळ मिळाला की दोघे सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असतात. मात्र यावेळेस मलायकाने एकटीचा फोटो शेअर केला आहे.
मलायका सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. मलायकाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. कमी मेकअप व सनग्लासेस लावलेली या फोटोत दिसते आहे. या सोबत तिने व्हाईट आऊटफिट परिधान केला आहे. मलायकाने हा फोटो शेअर करत लिहिलं की, 'मी, स्वतः...एकासाठी टेबल.'
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायका अरोराने ट्रोलिंगबाबत वक्तव्य केलं. मलायका म्हणाली की, मलायका व अर्जुनच्या रिलेशनशीपबाबतच्या निगेटिव्ह कमेंटमुळे तिला अजिबात फरक पडत नाही. या सगळ्या सामान्य गोष्टी आहेत. लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्सबाबत मलायका म्हणाली की, तुम्ही लोकांना रोखू शकत नाही, ते त्यांचं मत आहे.
मलायका पुढे म्हणाली की, लोक प्रत्येक गोष्टीची चाचणी पडताळणी करतात. जर तुम्ही या बिझनेसमध्ये आहात आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय आहे. अशी स्थिती कोणत्याही सेलिब्रेटीची असू शकते.
नुकतंच मलायकाने अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबाबतच्या अफवा फोल असल्याचं सांगितलं ती म्हणाली की, अर्जुनसोबत लग्न केवळ अफवा आहे. आम्ही दोघे जसे आहोत तसे खूप खूश आहोत. मीडियामध्ये आमच्या दोघांच्या लग्नाला घेऊन बऱ्याच अफवा ऐकायला मिळतात.