मलाईका अरोरा म्हणतेय, आयटम नंबर करून खूश; हिरोईन कोणाला व्हायचं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 16:27 IST2017-02-08T10:57:17+5:302017-02-08T16:27:17+5:30
बॉलिवूडच्या कित्येक सिनेमातील आयटम नंबरमध्ये ठुमका लावणारी अभिनेत्री मलाईका अरोरा हिला अभिनेत्री होण्यात अजिबात रस नसल्याचे तिने स्पष्ट केले ...

मलाईका अरोरा म्हणतेय, आयटम नंबर करून खूश; हिरोईन कोणाला व्हायचं!
ब लिवूडच्या कित्येक सिनेमातील आयटम नंबरमध्ये ठुमका लावणारी अभिनेत्री मलाईका अरोरा हिला अभिनेत्री होण्यात अजिबात रस नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. आयटम नंबर करून मी खूश असून, हिरोईन कोणाला व्हायचंय! असेही ती म्हणाली आहे.
![]()
‘छैया छैया, माही वे, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली’ यांसारख्या हिट आयटम नंबरवर आपल्या डान्स आणि सौंदर्यांच्या अदा दाखविणारी मलाईका अरोरा हिला आतापर्यंत एकाही बड्या बॅनरच्या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या रूपात काम करायला मिळाले नाही. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या ‘खान’ परिवाराशी संबंधित असतानाही तिला एक यशस्वी अभिनेत्री म्हणून दर्जा मिळाला नाही. आतापर्यंत ती केवळ आयटम नंबर आणि मॉडलिंगच्याच रॅम्पवरच बघावयास मिळाली. नुकतीच ती लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर उतरली असता, याविषयी प्रश्न केले. तिनेही अगदीच मोकळेपणाने अभिनेत्री न होण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ती म्हणाली की, सिनेमात मी मुख्य भूमिका करू इच्छित नाही. मी कॅमियो आणि आयटम नंबर करून खूश असल्याचे सांगितले.
![]()
जेव्हा तिला कौटुंबिक जबाबदाºयांमुळे तू मोठ्या पडद्यापासून दूर राहिलीस का? असे विचारण्यात आले तेव्हा तिने, अजिबात नाही. मला कधीच मोठ्या पडद्याविषयी आकर्षण राहिले नाही. मला फक्त कॅमियो आणि आयटम सॉँग करण्याचीच सुरुवातीपासून इच्छा होती. कारण मी स्वत:ला संपूर्ण सिनेमात काम करताना कधीही इमॅजिन केलेले नाही. त्याचबरोबर भविष्यात संधी मिळाल्यास याविषयी नक्की विचार करेल, असे म्हणण्यासही ती विसरली नाही.
![]()
मलाईकाच्या मते, आई म्हणून जबाबदारी पार पाडत असताना स्वत:ला अभिनेत्री म्हणून सिद्ध करणे खूपच अवघड आहे. मलाईका १५ वर्षाचा अरहान नावाचा मुलगा आहे. आयटम नंबरसाठी ओळखली जाणारी मलाईका गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यावरीलही चर्चेतला चेहरा ठरत आहे. ‘नच बलिए, जरा नचके दिखा, झलक दिखला जा आणि इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोमध्ये ती जज्च्या भूमिकेत बघावयास मिळाली आहे.
![]()
जेव्हा तिला छोट्या पडद्याशी जुळण्यामागचे कारण विचार विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, टीव्हीच्या रूपात छोटा पडदा प्रत्येक घरात उपलब्ध आहे. त्यामुळेच मला छोट्या पडद्याविषयी नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्या तुलनेत मोठ्या पडद्यावर सिनेमा बघण्यासाठी घराबाहेर जावे लागते. शिवाय प्रेक्षकांना पैसेही मोजावे लागतात. त्यामुळे छोटा पडदा माझ्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरला असल्याचे ती म्हणाली.
मलाइका तिच्या फिटनेससाठी ओळखली जातेय. त्याचबरोबर सेक्सी आणि हॉट अवतारासाठीही ती ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी पती अरबाज खान याच्याबरोबरच्या बिघडलेल्या संबंधांमुळे ती चर्चेत आली होती. दोघांचे संबंध घटस्फोटापर्यंत गेले आहे.