Malaika-Arjun: ब्रेकअप के बाद! मलायकाने अर्जुनच्या कुटुंबियांना केलं अनफॉलो, जान्हवी-खुशी फ्रेंडलिस्टमधून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 01:18 PM2023-08-26T13:18:23+5:302023-08-26T13:22:54+5:30

मलायकापासून वेगळा झालेला अर्जुन दुसऱ्या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Malaika arora reportedly unfollowed arjun kapoor sisters anshula kapoor janhvi kapoor and khushi kapoor on instagram | Malaika-Arjun: ब्रेकअप के बाद! मलायकाने अर्जुनच्या कुटुंबियांना केलं अनफॉलो, जान्हवी-खुशी फ्रेंडलिस्टमधून गायब

Malaika-Arjun: ब्रेकअप के बाद! मलायकाने अर्जुनच्या कुटुंबियांना केलं अनफॉलो, जान्हवी-खुशी फ्रेंडलिस्टमधून गायब

googlenewsNext

अर्जुन कपूर- मलायका अरोरा नातं सध्या खूप चढ-उतारांमधून जात आहे. दोघांचं मार्ग वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाले आहे. हे. मलायका आणि अर्जुन वेगळे झाले असून अभिनेता दुसऱ्या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. मलायका आणि अर्जुनकडून ब्रेकअपच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

ब्रेकअपच्या अफवांदरम्यान मलायका अरोराने तिच्या बॉयफ्रेंडच्या कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. मलायकाने अर्जुन कपूरच्या तीन बहिणी अंशुला, जान्हवी आणि खुशी यांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले असल्याची चर्चा आहे. याशिवाय,  दिग्दर्शक-निर्माता बोनी कपूर आणि अनिल कपूर यांनाही फॉलो करत नाही. मात्र, मलायका अजूनही अर्जुन कपूरला फॉलो करत आहे.


अर्जुन कपूरचे नाव सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लुयन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलासोबतही जोडले जात आहे.  कुशा कपिलाने या चर्चांवर आलिकडेच प्रतिक्रिया दिली होती. अर्जुन कपूरला डेट करत असल्याच्या वृत्तांवर टिप्पणी करताना ती म्हणाली, 'माझ्याबद्दल इतकं बकवास रोज वाचल्यानंतर, मला स्वतःचा एक फॉर्मेट परिचय करून द्यावा लागेल. मी नेहमीच माझ्याबद्दल मूर्ख गोष्टी पाहते. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या आईने हे सर्व वाचू नये. तिच्या सोशल लाइफला धक्का बसेल.

 मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर सोलो व्हेकेशनचा फोटो शेअर केले होते.
 

Web Title: Malaika arora reportedly unfollowed arjun kapoor sisters anshula kapoor janhvi kapoor and khushi kapoor on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.