'या' कारणामुळे आठवडाभर चर्चेत राहिली मलायका अरोरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 21:00 IST2019-04-21T21:00:00+5:302019-04-21T21:00:00+5:30
मलायका अरोरा गेल्या आठवड्याभर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली. कधी मालदिवच्या फोटोंना घेऊन तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाला घेऊन तर कधी हॉस्पीटलमध्ये स्पॉट झाल्यामुळे.

'या' कारणामुळे आठवडाभर चर्चेत राहिली मलायका अरोरा
मलायका अरोरा गेल्या आठवड्याभर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली. कधी मालदिवच्या फोटोंना घेऊन तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाला घेऊन तर कधी हॉस्पीटलमध्ये स्पॉट झाल्यामुळे. मलायका गेल्या काही दिवसांपासून अर्जुनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 21 ते 27 एप्रिलच्या दरम्यान ख्रिश्चन वेडिंग करण्याची शक्यता. मिळालेल्या माहितीनुसार हे लग्न गोव्यात होणार आहे, जिथं दोघांचे कुटुंबीय उपस्थित असणार आहेत. दोघांनी आपल्या मित्रपरिवाराला या तारखा फ्री ठेवण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचे हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट यांनी लग्नाच्या तयारीबद्दल कोणालाही सांगायचे नाही अशी ताकीद त्यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे.
नुकतेच मलायका हॉस्पीटलमध्ये देखील स्पॉट झाली होती. रिपोर्टनुसार मलायका प्री मॅरिटियल चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होती. याआधी ही मलायका हॉस्पीटलमध्ये गेली होती त्यावेळी तिच्यासोबत अर्जुन देखील होता.
काही दिवसांपूर्वीच मलायका मालदीवमध्ये आपल्या गर्ल गँग सोबत व्हॅकेशनवर गेली होती.अर्जुनसुद्धा या ट्रीपमध्ये जॉईन झाला होता. रिपोर्टनुसार मलायकाची ही लग्ना आधीची बॅचलर पार्टी होती. अलीकडे मलायकाने आपल्या सोशल अकाऊंटवर स्वत:चे काही बिकिनी फोटो शेअर केलेत. मालदीव व्हॅकेशनदरम्यानचे हे फोटो आहेत.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, या सर्व चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. अर्जुन आणि मलायकाने त्यांचं नातं कधीच अधिकृतपणे स्वीकारले नाही मात्र करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते.