अरबाज खान, अर्जून कपूरनंतर मलायका पुन्हा प्रेमात? 'मिस्ट्री मॅन'बद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:59 IST2026-01-14T15:58:26+5:302026-01-14T15:59:16+5:30
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

अरबाज खान, अर्जून कपूरनंतर मलायका पुन्हा प्रेमात? 'मिस्ट्री मॅन'बद्दल म्हणाली...
बॉलिवूडची 'फिटनेस आयकॉन' आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी अरबाज खानसोबतचा तिचा घटस्फोट, तर कधी अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चा सतत लाइमलाइटमध्ये राहिल्या आहेत. इतकंच नाही तर ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसली, तरी सोशल मीडियावर लोक तिला त्या व्यक्तीसोबत रोमान्टिक पद्धतीने जोडू लागतात. आता नुकताच अभिनेत्रीने एक मुलाखत दिली असून, या सर्व मुद्द्यांवर तिने मोकळेपणाने आपलं मत मांडलं आहे.
'द नम्रता झकेरिया शो'मध्ये मलायका अरोरानं ती सध्या कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे स्पष्ट केले आहे. मलायका म्हणाली, "जर मी एखाद्या मित्रासोबत, मॅनेजरसोबत किंवा अगदी माझ्या जुन्या मित्रासोबत घराबाहेर पडले, तरीही लोक त्याला 'लिंक-अप' म्हणतात. तो मित्र समलिंगी असो वा विवाहित, लोकांना फक्त बातम्या बनवायच्या असतात. आता तर माझी आईही मला फोन करून विचारते, 'बेटा, आता कोणता नवीन हिरो तुझ्या आयुष्यात आलाय?' आम्ही सर्वजण यावर आता फक्त हसतो".
मलायकाने सुरुवातीला थोडी नाराजी व्यक्त करत म्हटले की, "एक काळ असा होता जेव्हा मी सांगायचे की माझं आयुष्य केवळ नात्यापुरतं मर्यादित नाही. पण लोकांना कामापेक्षा अशाच बातम्यांमध्ये रस असतो. आता मला कोणालाही काहीही सिद्ध करायची गरज वाटत नाही. मला ज्यातून मनःशांती मिळेल, तेच मी करणार".
अलिकडेच मलायका हिचं डायमंड व्यावसायिक हर्ष मेहता याच्याशी नाव जोडलं गेलंय. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दरम्यान, मलायका अरोराने १९९८ मध्ये बॉलिवूड अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. दोघांनाही एक मुलगा अरहान खान आहे. लग्नाच्या १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं. परंतु काही मतभेदांमुळे मलायका-अर्जुनचा ब्रेकपअप झाला. पण, अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर स्वत: ला सावरत मलायकाने नवी इनिंग सुरू केल्याचं पाहायला मिळतंय.