अरे बापरे, लग्नाआधीच हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेली मलायका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 15:33 IST2019-04-18T15:33:07+5:302019-04-18T15:33:12+5:30
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या त्यांच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार मलायका प्री मॅरिटियल चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होती.

अरे बापरे, लग्नाआधीच हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेली मलायका
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या त्यांच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार मलायका प्री मॅरिटियल चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होती. अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा आहेत. ईस्टरच्या वीकेंडला दोघे लग्न करु शकतात. 19 ते 27 दरम्यान ख्रिश्चन वेडिंग करण्याची शक्यता. मिळालेल्या माहितीनुसार हे लग्न गोव्यात होणार आहे. जिथं दोघांचे कुटुंबीय उपस्थित असणार आहेत. दोघांनी आपल्या मित्रपरिवाराला या तारखा फ्री ठेवण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचे हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट यांनी लग्नाच्या तयारीबद्दल कोणालाही सांगायचे नाही अशी ताकीद त्यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच मलायका मालदीवमध्ये आपल्या गर्ल गँग सोबत व्हॅकेशनवर गेली होती.अर्जुनसुद्धा या ट्रीपमध्ये जॉईन झाला होता. रिपोर्टनुसार मलायकाची ही लग्ना आधीची बॅचलर पार्टी होती. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, या सर्व चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही.
तरीही करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले अर्जुन ‘पानीपत’मध्ये दिसणार आहे. आशुतोष गोवारीकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. ज्यात त्याच्यासोबत संजय दत्त आणि क्रिती सॅनन दिसणार आहे.