छोटा ड्रेस घालून चालण्याच्या स्टाईलवरून ट्रोल झाली मलायका अरोरा, म्हणाले - हिला झालं तरी काय...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:28 IST2021-12-22T16:00:59+5:302021-12-22T16:28:59+5:30
मलायका अरोरा (Malaika Arora) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहुन लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

छोटा ड्रेस घालून चालण्याच्या स्टाईलवरून ट्रोल झाली मलायका अरोरा, म्हणाले - हिला झालं तरी काय...?
मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या लूकने चाहत्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकांना आवडते. दरम्यान, मलायका अरोरा (Malaika Arora) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका सिजलिंग लूकमध्ये दिसते आहे. मात्र, काही लोकांना तिची चालायची स्टाईल अजिबात आवडली नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
मलायका अरोराचा व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओमध्ये मलायका अरोरा ग्रीन शिमरी ड्रेसमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. पोनीटेल स्टाइलमध्ये तिने केसांची स्टाईल केली आहे. यासोबत ती हाय हिल्समध्ये दिसते आहे. मलायकाचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या सौंदर्य आणि फिटनेसचे कौतुक करत आहेत. मलायकाने तिच्या वाढत्या वयातही फिटनेस चांगला मेन्टेंन केला आहे. दुसरीकडे मलायकाची चालण्याची पद्धत काही लोकांना विचित्र वाटली आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
याकारणामुळे ट्रोल झाली मलायका
मलायका अरोरा (Malaika Arora) चा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, जो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, हिच्या चालीला काय झाले आहे. आणखी एक टिप्पणी केली, चालणाऱ्या ग्लिटरसारखी दिसते. दुसर्याने लिहिले, ही नेहमी अशी का चालते.