मलायका भलतीच खूश्श; Ex-Husband अरबाज खानने पाठवले या सीझनचे सर्वात स्पेशल गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 17:15 IST2021-03-24T17:14:29+5:302021-03-24T17:15:06+5:30
स्वत:चे रोज नवे ग्लॅमरस व बोल्ड फोटो शेअर करून मलायका चर्चेत असते. पण आता मलायकाने असे काही शेअर केले की,तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मलायका भलतीच खूश्श; Ex-Husband अरबाज खानने पाठवले या सीझनचे सर्वात स्पेशल गिफ्ट
मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे ग्लॅमरस व बोल्ड फोटो शेअर करून मलायका चर्चेत असते. पण आता मलायकाने असे काही शेअर केले की,तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होय, मलायकाला एक स्पेशल गिफ्ट मिळाले आणि या गिफ्टचा व्हिडीओ तिने इन्स्टास्टोरीवर शेअर केला. हे गिफ्ट काय? यापेक्षा ते कुणी पाठवले? हे जाणून घेतल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गिफ्ट पाठवणारी ही व्यक्ती दुसरी कुणी नसून मलायकाचा एक्स-हसबण्ड अरबाज खान आहे.
अरबाजने मलायकाला स्वादिष्ट, गोड, रसाळ आंब्यांची पेटी पाठवली. या आंब्याचा पेटीचा एक व्हिडीओ मलायकाने इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. सोबत अरबाजचे आभारही मानले आहेत. ‘या आंब्यांसाठी धन्यवाद अरबाज... तुम्ही हे ऑनलाईन ऑर्डर करू शकता....’असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खान हे बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक मानले जात होते. ते दोघे कधी घटस्फोट घेतील असा विचार कुणी स्वप्नातही केला नव्हता. त्यामुळेच दोघांच्या घटस्फोटाची बातमी सर्वांसाठी धक्कादायक होती. 2016 मध्ये अरबाज व मलायकाने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मयालका लवकरच अभिनेता अर्जुन कपूरसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे तर अरबाज जॉर्जिया या मॉडेलसोबत नात्यात आहे.