आपबीती सांगत ढसा-ढसा live शोमध्ये अचानक रडू लागली मलायका अरोरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:33 IST2020-03-02T17:27:06+5:302020-03-02T17:33:31+5:30
मलायकाने आपल्या पर्सनल आयुष्यासंदर्भात अनेक खुलासे केले

आपबीती सांगत ढसा-ढसा live शोमध्ये अचानक रडू लागली मलायका अरोरा
मलायका अरोरा फिटनेस फ्रिक मानली जाते. मलायका अरोराच्या हॉटनेस आणि फिटनेस दोन्ही चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो टाकून मलायका एकीकडे चाहत्यांना घायाळ करते, दुसरीकडे तिचे फिटनेस व्हिडीओ पाहून लोकांना कुतूहल वाटते. मलायका सध्या 'इंडियाज बेस्ट डान्सर' या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतेय. या शोदरम्यान मलायकाने आपल्या पर्सनल आयुष्यासंदर्भात अनेक खुलासे केले. आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलताना मलायकाला अश्रू अनावर झाले होते.
या शोमध्ये एक स्पर्धक आली होती जी दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांनी आईला सोडून दिले. यानंतर आईने काम करुन तिला वाढवले आणि डान्सर बनवले. या मुलीची गोष्ट ऐकून मलायका खूपच इमोशनल झाली आणि तिला तिचे दिवस आठवले. मलायका म्हणाली, मला सुद्धा मोठी होऊन डान्सर व्हायचे होते. माझ्या वडिलांनी आईला सोडले होते. त्यानंतर मला आणि अमृताला आईने एकटीनेच वाढवले.''
सध्या अर्जुन कपूर व मलायका अरोरा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेले हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा आहे. आधी मलायका व अर्जुनने आपले नाते जगापासून लपवले. अर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सुरुवातीला दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.