बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी मलायका अरोरा बनली चिअर लीडर, शेअर केला हा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 18:27 IST2021-03-05T18:25:26+5:302021-03-05T18:27:57+5:30
अभिनेत्री मलायका अरोरा बऱ्याचदा ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत येत असते.

बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी मलायका अरोरा बनली चिअर लीडर, शेअर केला हा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बऱ्याचदा ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत येत असते. तर कधी ती अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळेदेखील चर्चेत येते. बऱ्याचदा दोघे एकत्र पार्टी आणि डिनर करताना दिसतात. नुकतेच अर्जुन कपूरने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रकुल प्रीत सिंगसोबतच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे सरदार का ग्रॅण्डसन.
अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंगचा आगामी चित्रपट सरदार का ग्रॅण्डसनची घोषणा केली आहे. दरम्यान मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला चिअर करत चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे आणि रकुल प्रीत सिंग आणि अर्जुन कपूरला टॅग केले आहे. मलायका अरोराची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.
सरदार का ग्रॅण्डसन सिनेमाची कथा क्रॉस बॉर्डरवरील लव्हस्टोरी आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली नाही. चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग शिवाय नीना गुप्ता आणि अदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहे. तसेच यात सोनी राजदानदेखील दिसणार आहे.
या चित्रपटाशिवाय अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा सोबत संदीप और पिंकी फरार चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १९ मार्चला रिलीज होणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.