VIDEO : कुछ तो गडबड है...! मलायका व अर्जुनचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचं वाढलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:17 IST2022-08-01T18:17:22+5:302022-08-01T18:17:49+5:30
Malaika Arora- Arjun Kapoor : होय, कपलचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि तो पाहून या लव्हबर्ड्समध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झालीये.

VIDEO : कुछ तो गडबड है...! मलायका व अर्जुनचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचं वाढलं टेन्शन
मलायका अरोरा (Malaika Arora) व अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या लव्ह बर्ड्सची चर्चा नेहमीच होताना दिसते. दोघांचा रोमान्स, दोघांची सिजलिंग केमिस्ट्री अशा अनेक चर्चा रंगतात. दोघंही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. पण यावेळी असं नाही. होय, कपलचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि तो पाहून या लव्हबर्ड्समध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झालीये.
मलायका व अर्जुन दोघंही सोबत असताना हातात हात घालून दिसतात. एअरपोर्टवर हातात हात घालून पापाराझींना पोझ देतात. पण यावेळी दोघंही एकमेकांपासून फटकून वागताना दिसले आणि मग चर्चा सुरू झाली.
मलायका व अर्जुनचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात मलायका व अर्जुन दोघंही एकमेकांपासून अंतर राखून चालताना दिसत आहेत. दोघांचा मूडही खराब दिसतोय. कपलच्या चेहऱ्यावरचं हे टेन्शन पाहून चर्चा तर होणार. दोघांचं कदाचित भांडण झालं असावं, अशी शंका हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
कदाचित दोघांमध्ये भांडण झालं, अशी कमेंट एका युजरने व्हिडीओवर केली आहे. कुछ तो गडबड है, असं एकाने लिहिलं आहे. आता मलायका व अर्जुनमध्ये नेमकं काय बिनसलं, कळायला मार्ग नाही. पण या व्हिडीओची चर्चा जोरात आहे.
काही दिवसांपूर्वीच दोघांच्या ब्रेकअपची चर्चा जोरात होती. पण या सगळ्या चर्चा अफवा ठरल्या होत्या. एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा सुरू असताना हे कपल रोमॅन्टिक व्हॅकेशनवर गेलं होतं. कालपरवा मनिष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये हे कपल एकमेकांवर प्रेमाची उधळण करताना दिसलं होतं. अर्जुन कपूर रॅम्प वॉक करत असताना मलायका त्याला चीअर करत होती. अगदी त्याला फ्लाइंग किस देत तिने आनंद व्यक्त केला होता. पण आत्ताचा हा व्हिडीओ मात्र वेगळंच काही सांगतोय. अर्थात काय खरं काय खोट, हे मलायका व अर्जुनलाच ठाऊक़