अरबाज खानला घटस्फोट देण्याआधीच सुरु झाली होती मलायका अर्जुनची लव्हस्टोरी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 20:12 IST2022-07-18T20:12:08+5:302022-07-18T20:12:57+5:30
अरबाजसोबतचं नातं संपवायचं नव्हतं असंही मलायकानं सांगितलं होतं. “प्रत्येकाला जीवनात जोडीदार, नातं हवं असतं. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे असंही तिने म्हटलं होतं.

अरबाज खानला घटस्फोट देण्याआधीच सुरु झाली होती मलायका अर्जुनची लव्हस्टोरी ?
मलायका अरोरा आणि अरबाज खान हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध कपल . दोघांची केमिस्ट्रीही त्यांच्या चाहत्यांना चांगली पसंत होती. मात्र अचानक त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली आणि चाहत्यांनाही धक्काच बसला. दोघांचे १९ वर्षांचे संपवत त्यांनी घटस्फोट घेत वेगळे झाले. अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर काही महिन्यांतच मलायकाच्या अर्जुनसोबतच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला दोघेही आपलं प्रेम लपवताना दिसले. पण दोघांनाही त्यांचे प्रेम फार काळ काही जगापासून लपवता आले नाही. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नव्हतं. दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली द्यावीच लागली.
असेही म्हटले जाते की, अरबाजला घटस्फोट देण्याआधीच मलायका अर्जुनला पसंत करू लागली होती. मलायका अर्जुनच्या भेटीगाठीही वाढत होत्या.त्यानंतरच मलायकाचे अरबाजसोबतचे नातेही बिघडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरबाजच्या वाईट सवयींमुळे मलायकाने घटस्फोटासारखा निर्णय घेतला होता.दुसरीकडे अरबाजनेही जॉर्जियासोबत असलेल्या संबंधांची कबुली दिली होती.
अरबाजसोबतचं नातं संपवायचं नव्हतं असंही मलायकानं सांगितलं होतं. “प्रत्येकाला जीवनात जोडीदार, नातं हवं असतं. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे असंही तिने म्हटलं होतं. जे काही झालं चांगलंच झालं हे सांगायलाही ती विसरली नाही. सारं विसरून जीवनात पुढे जाताना ज्याच्यासोबत तुमचं चांगलं नातं निर्माण व्हावं असा एक चांगला मित्र आणि जोडीदार असावा, तसं झाल्यास तुम्ही नशीबवान असता.
जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एका फॅशन शोमध्ये एकत्र दिसले होते. या शोदरम्यान दोघांमध्ये वेगळीच बाँडिंग पाहायला मिळाली. त्यावरून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते.विशेष म्हणजे मलायकाआधी अर्जुन सलमान खानची बहीण अर्पिता खानला डेट करत होता.