Troll: मलायका अरोराचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, तर यूजर्सनी म्हटले,'या वयात तुला हे शोभतं काय?' असे काय केले मलायकाने, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 14:59 IST2019-11-19T14:54:18+5:302019-11-19T14:59:40+5:30
आज तिची एक झलक पाहण्यासाठी रसिक आतुर असतात. प्रत्यक्ष जीवनातही ती नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसते.

Troll: मलायका अरोराचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, तर यूजर्सनी म्हटले,'या वयात तुला हे शोभतं काय?' असे काय केले मलायकाने, जाणून घ्या
तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मोठ्या मानाने मिरवलं आहे. सध्या ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ती अभिनेत्री म्हणजे छैय्या छैय्या गर्ल बॉलिवूडची मुन्नी असं जिच्याबद्दल म्हटले जाते ती म्हणजे मलायका अरोरा. रूपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन घडत नसलं तरी सध्या विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि सोहळे आणि फिटनेस व्हिडीओमधूनही तिचं दर्शन रसिकांना होत असतं. आज तिची एक झलक पाहण्यासाठी रसिक आतुर असतात. प्रत्यक्ष जीवनातही ती नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसते.
मुळात स्टाइलबाबत नेहमीच सजग असणारी मलायकाचा एक फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप ट्रोलही होत आहे. या फोटोमुळे नेटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. या फोटोत तिने शर्ट टॉप प्रकारचा ड्रेस परिधान केलेला असला तरी खाली पँट घालायला विसरली की काय अशा कमेंटस तिच्या या फोटोवर नेटीझन्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. फिटनेस व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर मलायकाचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळते.