Makar Sankranti 2025: मकर संक्रातीला जिनिलिया देशमुखनं केलं सुगड पूजन, फोटो शेअर करत दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:25 IST2025-01-15T11:25:16+5:302025-01-15T11:25:41+5:30
जिनिलियानं देखील काल मकर संक्रातीच्या दिवशी सुगड पूजन केल्याचं पाहायला मिळालं.

Makar Sankranti 2025: मकर संक्रातीला जिनिलिया देशमुखनं केलं सुगड पूजन, फोटो शेअर करत दाखवली झलक
नव वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्राती होय. या सणाची महिला खुप आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या दिवशी छान तयारी करून हळदीकुंकवासाठी महिला एकमेकींकडे जातात. हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे. काल राज्यभरात मोठ्या उत्साहात मकर स्रकांत साजरी झाली. 'मकर संक्रात' हा सणही देशमुखांच्या घरात मोठ्या उत्साहानं साजरा झाला. जिनिलियानं देखील काल मकर संक्रातीच्या दिवशी सुगड पूजन केल्याचं पाहायला मिळालं.
'महाराष्ट्राची लाडकी सून' जिनिलिया हिनं नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मराठी परंपरेनुसार संक्रांतीचं पूजन करून जिनिलीयाने मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. जिनिलियानं काळ्या रंगाची साडी नेसल्याचं पाहायला मिळालं. तर मुलांनाही तिनं तिळगूळ भरवला.
ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेली जिनिलिया देशमुख कुटुंबात चांगलीच रुळली आहे. देशमुखांची सून झाल्यावर तिनं सगळे संसार, मराठी परंपरा आत्मसात केल्या आहेत. जिनिलिया तसंच तिचा पती अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या कुटुंबियांसोबत सगळे सण साजरे करत आपली संस्कृती जपताना दिसतात. रितेश आणि जिनिलयाची पहिली भेट २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. जवळपास ८ ते ९ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती.